Home /News /viral /

एक पाय नाही तरी हिंमत हरला नाही! दिव्यांग तरुणाने वाऱ्याच्या वेगाने सुसाट पळवली सायकल; पाहा प्रेरणादायी VIDEO

एक पाय नाही तरी हिंमत हरला नाही! दिव्यांग तरुणाने वाऱ्याच्या वेगाने सुसाट पळवली सायकल; पाहा प्रेरणादायी VIDEO

एक पाय नसलेल्या या व्यक्तीने फक्त सायकल चालवलीच नाही तर अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पळवून दाखवली आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : सायकल चालवणं (Cycling video) म्हणजे त्याचे दोन्ही पँडल मारणं गरजेचं आहे. त्यासाठी दोन्ही पाय हवेत. पण एका दिव्यांग व्यक्तीने मात्र एका पायाने सायकल चालवून दाखवली आहे (Disabled man riding bicycle). एक पाय नसलेल्या या व्यक्तीने फक्त सायकल चालवलीच नाही तर अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पळवून दाखवली आहे. इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. इच्छा तिथे मार्ग असतोच हे एका दिव्यांगाने दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर एका दिव्यांगाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याला एक पाय नाही आहे पण एकाच पायावर तो सायकल चालवताना दिसतो आहे. एका पायानेही हा तरुण अगदी वाऱ्याच्या वेगाने सायकल पळवतो आहे. रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासीही त्याला पाहून थक्क झाले आणि त्यांनी या व्यक्तीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. आता या व्यक्तीला एकच पाय आहे, ती सायकल कशी काय चालवेल. या व्यक्तीने आपला एक पाय सायकलच्या एका पँडलवर ठेवला आहे आणि दुसरा पँडल मारण्यासाठी त्याने काठी वापरली आहे. एका हातात काठी घेऊन त्याने दुसरा पँडल फिरवते आहे. अशा पद्धतीने ही व्यक्ती सायकल चालवते आहे. हे वाचा - उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO जरा विचार करा एका पायावर तुम्ही काय करू शकता. किमान एक पाय दुमडून फक्त एका पायावर थोडा वेळ तुम्हाला एकच पाय आहे, असं समजून चाला. बघा तुम्हाला काय काय करणं शक्य होतं आहे. आता या माणसाप्रमाणे सायकलही चालवून पाहा. त्यावरूनच ही व्यक्ती किती मेहनत घेते आहे, याची कल्पना तुम्हाला येईल. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा तरुण म्हणजे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या हिमतीला, जिद्दीला सर्वांनी सॅल्युट केलं आहे. त्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातं आहे. हे वाचा - ...आणि या अनोख्या लग्नात नवरीमुलीनेच करू दिलं नाही 'कन्यादान' आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हिंमत अशी असेल तर कोणतीच अडचण तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bike riding, Viral, Viral videos

    पुढील बातम्या