नवी दिल्ली 21 जून : जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day) साजरा केला जात आहे. लोक आपल्या घरांमध्ये, पार्कमध्ये तसंच व्यायाम केंद्रांमध्ये एकत्र येत योगा करत आहेत. भारतात योगाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काही लोक योगा सेशनसाठी ऑनलाईन क्लास घेत आहेत, तर काही योगा सेंटरमध्ये जाऊन शिकत आहेत. यादरम्यान काही लोक योगा करतानाचे व्हिडिओही (Yoga Video) आपल्या सोशल मीडियावर (Social Media)) शेअऱ करत असतात. अरे! ही तरुणी फुग्यात कशी शिरली? हा VIDEO पाहून तुम्ही देखील पडाल बुचकळ्यात योगा दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणारे काही लोक असेही आहेत, जे विनोदी व्हिडिओ अपलोड करतात. हे व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. नुकतंच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या घरामध्ये योगा करत आहे. इतक्यात तिथे एक मुलगी येते. ही तरुणी या व्यक्तीच्या पायावर मागील बाजूने येऊन उभा राहाते. यानंतर याची काहीही भनक नसलेला योगा करणारा व्यक्ती हैराण होतो आणि त्याचे डोळे भितीनं एकदम मोठे होतात.
VIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्… सुरुवातीला तर हा व्यक्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मात्र, नंतर त्याला जाणवत की हे अतिशय त्रासदायक होतं. हा व्हिडिओ मायकल स्टेननं शेअर केला आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत मजा घेत आहेत.