नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : एका तरुणीचं शेजारीच राहाणाऱ्या तरुणावर प्रेम जडलं. मुलगा दुसऱ्या जातीतील असल्याने घरच्यांनी लग्नाला विरोध केला. अशा स्थितीत मुलीने पळून जाऊन लग्न केलं (Love Marriage). लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. सर्व काही ठीक चाललं होतं, पण एके दिवशी तिच्या आयुष्यात मोठा भूकंप आला. तिच्या पतीचा अचानक मृत्यू झाला (Death of Husband). ही कथा Humans Of Bombay च्या इंस्टाग्राम पेजवर एका महिलेच्या हवाल्याने शेअर करण्यात आली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती 15 वर्षांची असताना शेजारी राहणाऱ्या मयूर नावाच्या मुलाशी तिची भेट झाली. काही काळातच दोघे चांगले मित्र बनले. एक दिवस मयूरने तिला प्रपोज केलं. तिनेही होकार दिला, पण घरी हे कळू दिलं नाही कारण मयूरची जात वेगळी होती. एक दिवस तरुणीच्या आई-वडिलांना हे सर्व समजलं. त्यांनी तिला मयूरला भेटण्यास आणि त्याच्यासोबत बोलण्यास बंदी घातली. मात्र मयूरने तरुणीच्या चुलत भावाच्या मदतीने तिच्यासोबत संपर्क साधला. दोघे रेल्वे स्टेशनवर धावत सुटले आणि त्यांनी शहर सोडलं. पुढे त्यांचं लग्न झालं. काही काळातच तिने दोन मुलींना जन्म दिला.
उत्साहाने लग्नाच्या तारखेचा टॅटू गोंदवला; ऐनवेळी घडलं असं काही की हादरलं कपल
दाम्पत्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं. कालांतराने कुटुंबातील सदस्यांपासूनचं अंतरही कमी झालं. पण एके दिवशी मयूर झोपला आणि पुन्हा उठलाच नाही. त्यानी अचानक जगाचा निरोप घेतला. मयूरचं निधन होताच पत्नीला आयुष्य संपल्यासारखं वाटू लागलं. वयाच्या 32 व्या वर्षी 2 मुलींना एकटीने कसं वाढवायचं? हा विचार करूनच ती घाबरली. पण मुलींनी आईला समजावलं- ‘वडील कायम आपल्या हृदयात असतील मात्र आता आपल्याला आयुष्यात पुढे जायचं आहे.’
मुलींच्या या शब्दांनी प्रेरित होऊन एकट्या आईने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलली आणि बघता बघता 7 वर्षे कशी निघून गेली ते कळलंच नाही. पण याच काळात त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, ज्याने त्यांचं घर पुन्हा आनंदानं भरलं.
प्रेयसी झोपताच 85 महिलांना मेसेज पाठवायचा प्रियकर; लिहायचा ‘हा’ एकच शब्द
पती मयूरच्या निधनानंतर, आपल्या मुलींसह एकट्या राहणाऱ्या महिलेच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा तिची बालपणीचा मित्र मुकेशसोबत कौटुंबिक लग्नात भेट झाली. दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. मुकेशने महिलेमध्ये रस दाखवला, परंतु महिलेला तिच्या भूतकाळाबद्दल भीती वाटत होती. अनेक महिने मुकेशची परीक्षा घेतल्यानंतर महिलेने त्याच्याशी लग्न केलं. महिलेचे म्हणणं आहे की, सर्व काही माहीत असूनही मुकेशने मला आणि माझ्या मुलींना स्वीकारलं. महिलेच्या म्हणण्यानुसार, आमचं एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं, तेव्हापासून आम्ही चौघं बेस्ट फ्रेंड्ससारखे राहत आहोत. महिलेनं सर्वांना सल्ला दिला की - ‘तुमच्या नशीबातही प्रेमाची दुसरी संधी असेल तर ती वाया घालवू नका!’