स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, क्रॅश झालेल्या प्लेनने कॅलिफोर्नियाच्या पॅकोइमा इथून उड्डाण केलं होतं. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काही अंतरावर जाताच हे प्लेन क्रॅश झालं. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये क्रॅश झालेलं विमान रेल्वे रुळावर कोसळल्याचं दिसतं. यानंतर काही पोलीस, ट्रेन तिथे येण्यासाठी पायलटला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतात. याचदरम्यान समोरून ट्रेन येताना दिसताच पोलीस आणखीच घाईत आपलं काम करू लागतात. प्लेनचा पायलेट उठवण्याच्याही अवस्थेत नसल्याचं दिसतं. संशयी गर्लफ्रेंडची दहशत! रागात असं काही केलं की भीतीने BF शहर सोडूनच पळाला अनेक प्रयत्नांनंतर पोलिसांनी या पायलटला प्लेनमधून बाहेर काढलं आणि ओढत रुळापासून दूर नेलं. पायलटला रुळापासून दूर घेताच रुळावरुन अगदी वेगात ट्रेन गेल्याचं पाहायला मिळतं. पोलिसांनी सतर्कता दाखवत पायलटला अगदी वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. लॉस एंजेलिस पोलीस विभागाने यासाटी पोलिसांच्या कामाचं कौतुक करत, हा व्हिडिओ शेअर केला आहे.Foothill Division Officers displayed heroism and quick action by saving the life of a pilot who made an emergency landing on the railroad tracks at San Fernando Rd. and Osborne St., just before an oncoming train collided with the aircraft. pic.twitter.com/DDxtGGIIMo
— LAPD HQ (@LAPDHQ) January 10, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Crash, Shocking video viral