मराठी बातम्या /बातम्या /Viral /चालत्या स्कूटीवरच कपलचा रोमान्स, बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे, VIDEO VIRAL

चालत्या स्कूटीवरच कपलचा रोमान्स, बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ लखनऊच्या हजरतगंजचा आहे. जिथे चालत्या स्कूटीवर तरुण आणि तरुणीनं असं कृत्य केलं की त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.  चालत्या स्कूटीवरच हे दोघंही रोमान्स करू लागले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

लखनऊ 18 जानेवारी : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं चालत्या स्कूटीवर रोमान्स करत असल्याचं दिसून येतं. हा व्हिडिओ कधीचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. लखनौ सेंट्रल झोनच्या डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मोटार वाहन कायद्यासोबतच अश्लीलता पसरवणाऱ्याबाबतही कारवाई करण्यात येणार आहे.

हा व्हिडिओ लखनऊच्या हजरतगंजचा आहे. जिथे चालत्या स्कूटीवर तरुण आणि तरुणीनं असं कृत्य केलं की त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. चालत्या स्कूटीवरच हे दोघंही रोमान्स करू लागले.

लग्नात तरुणाने नवरी-नवरदेवाच्या अंगावरच मारली उडी; पुढं जे केलं ते पाहून व्हाल हैराण...VIDEO

दोघंही लखनऊच्या रस्त्यावर खुलेआम फिल्मी स्टाईलमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा मुलगा स्कूटी चालवताना दिसत आहे. ट्रॅफिकच्या नियमानुसार मुलीने हेल्मेट घालून स्कूटीवर बसायला हवं, मात्र मुलगी तरुणाच्या मांडीवर बसून त्याला मिठी मारून बसलेली दिसते.

यादरम्यान या दोघांना पाहून सगळेच हैराण झाले. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा प्रकारे रस्त्यावर हे कृत्य करणं जोडप्यासाठी फक्त धोकादायकच नाही तर वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. यासोबतच सामाजिकदृष्ट्या ही घटना अत्यंत अशोभनीय आहे. जोडप्याला रस्त्यात असं कृत्य करताना पाहून मुलांवरही परिणाम होईल, असं अनेकजण म्हणाले.

हेलमेटशिवाय दिसताच वाहतूक पोलिसाने अडवलं; दुचाकीस्वाराने केला असा जुगाड की चलानही कापता आलं नाही, VIDEO

हा व्हिडिओ व्हायरल होताच लखनऊच्या हजरतगंज पोलिसांनी तपास सुरू केला. लखनौ सेंट्रल झोनच्या डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ लखनऊच्या हजरतगंज भागातील आहे. या संपूर्ण प्रकरणासाठी दोन पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Romance, Shocking video viral