मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उडी मारली आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO

बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उडी मारली आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO

कपलचा व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकेल.

कपलचा व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकेल.

एकमेकांवरील प्रेम, विश्वास सिद्ध करण्याच्या नादात कपलने आपला जीव धोक्यात टाकला.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 ऑगस्ट : नातं (Relationship) कोणतंही असून त्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. नातं हे विश्वासाच्या धाग्यानेच बांधलेलं असलं आणि ते विश्वासावरच (Trust) टिकतं. अनेकदा कपल (Couple) असंच नात्यातील प्रेम (Love), विश्वास तपासण्यासाठी एकमेकांसोबत काही खेळ (Couple game) खेळतात, किंवा काही चॅलेंज (Trust game) देतात. सध्या असंच ट्रस्ट गेम खेळणाऱ्या एका कपलचा व्हिडीओ (Couple video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

प्रेम आंधळं असतं,  प्रेमात अनेक परीक्षा द्यावा लागतात, असं प्रेमाबद्दल आपण बरंच ऐकलं आहे. तुझं माझ्यावर किंवा माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे हे अनेकदा सिद्ध करावं लागतं. असं काहीतरी करण्याच्या नादात किती तरी कपल आपला जीवही धोक्यात टाकतात. अशाच कपलपैकी हे कपल. ज्यांनी स्वतःसह इतरांचा जीव मात्र भांड्यात टाकला. तरुणीने (Girlfriend) आपल्या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) भरवशावर उंच झाडावरून उलटी उडी घेतली आणि पुढे काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

हे कपल ट्रस्ट गेम खेळतं आहे. यामध्ये एक तरुणी झाडाच्या उंचावर उभी आहे. तर तिचा बॉयफ्रेंड झाडाच्या खाली उभा आहे. तरुणी बॉयफ्रेंडच्या दिशेने पाठ करून उभी आहे आणि ती स्वतःला झाडावरून उलट्या दिशेने झोकून देते. म्हणजे ती एकप्रकारे उंच उडी मारते. त्याचवेळी खाली असलेला तिचा बॉयफ्रेंड आपले दोन्ही हात वर करून तिला आपल्या हातांमध्ये झेलतो.

हे वाचा -Shocking! कंडोमऐवजी प्रायव्हेट पार्ट सील करून केला सेक्स; तरुणाचा मृत्यू

तरुणी इतक्या उंचावरून वेगाने पडल्याने तिला पकडताना तरुणाचाही बॅलेन्स थोडा बिघडतो. त्यावेळी आपल्या काळजाचाही ठोका चुकतोय. पण तरुण कसंबसं स्वतःला सावरतो. त्यानंतर त्याची पार्टनरही थोडी घाबरलेली दिसते. पण तरुण तिचा विश्वास जिंकतोच. पण थोडा जरी नेम चुकला असता तर तरुणीला गंभीर दुखापतही झाली असती.

हे वाचा - VIDEO- सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा; पेटत्या निखाऱ्यांवरून चालली सून

end_gallbaat1 इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी तरुणाचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी या कपलचं कृत्य म्हणजे वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. मुलीला पकडताना जर मोठी दुर्घटना झाली असती तर काय झालं असतं, अशी चिंता बहुतेकांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Couple, Viral, Viral videos