मराठी बातम्या /बातम्या /देश /भयंकर! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा; पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा धक्कादायक Video

भयंकर! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा; पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा धक्कादायक Video

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ.

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ.

 सासूच्या नजरेत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सुनेने दिली अग्निपरीक्षा.

राजेश कर्माले/भोपाळ, 24 ऑगस्ट : रामायणात सीतने आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिल्याचं माहितीच आहे. कलियुगातही असा भयंकर प्रकार घडला आहे. सासूच्या (Mother in law) टोमण्यांना कंटाळून एका सुनेने (Daughter in law) चक्क अग्निपरीक्षा दिली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी (Superstition) ती चक्कर पेटत्या निखाऱ्यांवरून चालली आहे (Woman walked on blazing embers). अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे.

आजही महिलेला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागत असल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे ती मध्य प्रदेशच्या छिंदवाडा (Chhindwara) जिल्ह्यातील सौंसरमध्ये. सासूच्या टोमण्यांना वैतागलेल्या सुनेने सासूच्या छळापासून मुक्ती हवी म्हणून पेटत्या निखाऱ्यांवरून चालत अग्निपरीक्षाही दिली.

" isDesktop="true" id="596742" >

आपल्या मुलाला काहीतरी खायला घालून सुनेने वश केलं आहे, असा आरोप सासूने केला. यावरून ती सुनेला सतत सुनवायची, टोमणे मारायची. दररोजच्या या कटकटीला सून इतकी वैतागली की अखेर यातून मुक्ती मिळवण्यासाठी ती भोंदूबाबाच्या विळख्यात अडकली.

हे वाचा - VIDEO - सेल्फी घेताना कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू', 160 फूट उंचावरून कोसळली तरुणी

भोंदूबाबाने सुरुवातीला धर्मग्रंथावर सुनेला हात ठेवायला सांगितला. तिच्या सासूला ती निर्दोष आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण सासू काही ऐकायला तयार नाही. मग भोंदूबाबाने अग्निपरीक्षेचा मार्ग सांगितला. सुनेला पेटत्या निखाऱ्यावर चालत आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करायला सांगितलं.

सून सासूच्या छळाला इतकी कंटाळली होती की ती त्यातून सुटका व्हावी म्हणून पेटत्या निखाऱ्यांवर चालायलाही तयार झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. मग महिलेचं कुटुंब, नातेवाईक, शेजारी, समाज, अख्खा गाव फक्त तमाशा पाहायला आला.

हे वाचा - अद्भुत! रंग बदलणारा Octopus पाहिलात का? कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा चमत्कार

जमिनीवर पेटते निखारे ठेवण्यात आले. त्यावरून आधी भोंदूबाबाने चालण्याचं नाटक केलं. त्यानंतर त्याने त्या महिलेला त्याच्यावरून चालायला सांगितलं. महिला एकदा नव्हे तर दोनदा या निखाऱ्यांवरून चालली.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh, Shocking viral video, Viral, Viral videos