मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Shocking! कंडोमऐवजी Private part सील करून केला सेक्स; तरुणाचा मृत्यू

Shocking! कंडोमऐवजी Private part सील करून केला सेक्स; तरुणाचा मृत्यू

कंडोम नव्हतं म्हणून त्याने एका ग्लुने प्रायव्हेट पार्ट सील केला.

कंडोम नव्हतं म्हणून त्याने एका ग्लुने प्रायव्हेट पार्ट सील केला.

कंडोम नव्हतं म्हणून त्याने एका ग्लुने प्रायव्हेट पार्ट सील केला.

  • Published by:  Priya Lad

अहमदाबाद, 24 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा किंवा लैंगिक आजार टाळण्यासाठी सुरक्षित सेक्ससाठी कंडोम वापरलं जातं. कंडोमशिवाय सेक्स करणं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा धोका. पण कंडोम नसेल तर काय? सुरक्षित सेक्स कसं करणार? एका तरुणाने यावर विचित्र मार्ग शोधला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे (Using adhesive instead of condom).

गुजरातच्या (Gujrat) अहमदाबादमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. 25 वर्षीय तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत लैंगिक संबंध ठेवत होता. पण दोघांकडेही कंडोम नव्हतं. म्हणून त्याने ग्लुने आपला प्रायव्हेट पार्ट सील करून टाकला. यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. सलमान मिर्झा असं या तरुणाचं नाव आहे.

सलमान आणि त्याची गर्लफ्रेंड दोघांनाही ड्रग्जचं व्यसन होतं, असं सांगितलं जातं आहे. 22 जूनला दोघंही जुहापुरातील एका  हॉटेलमध्ये होते.

हे वाचा - फोडणीसोबत बोल्डनेसचा तडका; रेसिपीपेक्षाही HOT CHEF

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मिर्झा आणि त्याची गर्लफ्रेंड जिच्यासोबत आधी तिचा साखरपुडाही झाला होता, दोघंही जुहापुरातील हॉटेलमध्ये गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते हॉटेलमध्ये जाताना दिसले. दोघांनीही ड्रग्ज घेतलं होतं, त्यानंतर त्यांनी लैंगिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रायव्हेट पार्ट सील करण्याचं ठरवलं जेणेकरून प्रेग्नन्सीचा धोका नको. एका ग्लूने त्याने आपला प्रायव्हेट पार्ट सील केला.

दुसऱ्या दिवशी तो रस्त्यावर एका ठिकाणी  बेशुद्धावस्थेत सापडला, त्याला पाहणाऱ्या मित्राने त्याला आपल्या घरी नेलें, त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे वाचा - फक्त 'टिक मार्क'ने केली नवऱ्याची पोलखोल; बायकोने केला सॉलिड जुगाड

ग्लुने प्रायव्हेट पार्ट सील केल्याने तरुणाची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीनेच त्याच्या प्रायव्हेट पार्ट सील केला असावा, असा आरोप तरुणाच्या कुटुंबाने केला आहे. मृताच्या विसरा नमुन्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

First published:

Tags: Gujrat, Lifestyle, Sex