जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काय सांगता? मासा खाणं महागात, तब्बल 15 लाखांचा दंड; पण का पाहा VIDEO

काय सांगता? मासा खाणं महागात, तब्बल 15 लाखांचा दंड; पण का पाहा VIDEO

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

तरुणीने मासे शिजवून खातानाचा आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो तिला चांगलाच फटका बसला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 31 जानेवारी : मासे म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मासे म्हणजे काही लोकांचा जीव की प्राणच. काही जणांना तर दररोज मासे लागतातच. पण असाच मासा खाणं एका तरुणीला मात्र चांगलंच महागात पडलं आहे. मासा खाल्ल्याने तिला तब्बल 15 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता मासे तर किती तरी लोक खातात मग मासा खाल्ला म्हणून या तरुणीला दंड कशाला? मासा खाणं गुन्हा आहे का? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. नेमकं हे काय प्रकरण आहे पाहुयात. हे प्रकरण आहे चीनमधील. चीनच्या एका तरुणीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात ती एक मासा खरेदी करून तो शिजवून खाताना दिसते. या तरुणीचं नाव जिन आहे. ती एक चिनी फूड ब्लॉगर आहे. आपल्या सोशल मीडियावर ती खाण्याशी  संबंधित व्हिडीओ पोस्ट करत असते. पण मासा खाण्याचा हा व्हिडीओ पोस्ट करणं तिला चांगलंच महागात पडलं. तिला 19 हजार डॉलर म्हणजे जवळपास 15 लाख रुपयांचा फटका बसला आहे. हे वाचा -  आश्चर्य! पाण्याबाहेर येताच माशाला फुटले पंख; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO जुलैमध्ये तिने टिकटॉकवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिचा कारनामा समोर आला. या व्हिडीओत जिन सर्वात आधी एक फळ खाते, जे तिला आवडत नाही. त्यानंतर ती मासे शिजवण्यासाठी भाज्या कापते. एका कढईत ती हा मासा शिजवते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने मासा दिसायला जितका खतरनाक आहे तितकंच त्याचं मांस नरम आहे, असं तिनं म्हटलं.

News18लोकमत
News18लोकमत

जिनने सुरुवातीला सांगितलं की, चीनच्या नानचोंग शहरातील एका दुकानातून तिने हा शार्क  1141 डॉलर म्हणजे जवळपास 93 हजार रुपयांना खरेदी केला होता. हे वाचा -  Shocking Video! जेवणाच्या ताटात अचानक जिवंत झाला मासा; व्यक्ती खाणार तोच त्याने तोंड उघडलं आणि… तब्बल 6 फूट लांबीचा हा मासा आहे. अगदी तिच्याइतकाच मोठा. हा मासा साधासुधा नाही. तर ग्रेट व्हाइट शार्क आहे.  हा मासा मोठा पांढरा शार्क असल्याचं डीएनएन चाचणीत समोर आलं आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. @NamoTheBestPM ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

हा मासा खाऊन फूड ब्लॉगरने चीनच्या वन्य प्राणी संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ज्याअंतर्गत काही वन्यजीव प्रजातींच्या कमर्शिअल व्यापारांवर बंदी आहे. या दंडासह पोलिसांनी दोन जणांना ताब्यातही घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात