मुंबई, 11 जानेवारी : मासे कुठे राहतात तर पाण्यात, मासे पाण्यात काय करतात तर पोहोतात. अगदी कोणत्याही लहान मुलाला विचारलं तरी तो हे सांगेल. आपण तसंच पाहत आलो आहोत. पण तुम्हाला कुणी माशांना पंख फुटले असं सांगितंल तर... काय? आश्चर्य वाटलं ना? आम्ही काहीही सांगतो आहोत, असंच तुम्ही म्हणाल. यावर तुमचा काय जगातील कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
पंख फुटलेल्या माशाचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तसं सामान्यपणे मासे पाण्यात जिवंत राहतात. पाण्याबाहेर काढल्यानंतर काही कालवधीनंतर त्यांचा मृत्यू होतो. पण या व्हिडीओतील माशाने मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाण्याबाहेर काढताच तो जिवंत राहिलाच पण त्याला पंख फुटले.
हे वाचा - नादच करायचा नाय! पठ्ठ्याने पाळलाय तब्बल 20 कोटींचा Dog; खासियत काय तुम्हीच पाहा
जसं सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं आणि ते रंगबेरंगी पंख पसरून उडावं अगदी तसंच पाण्याबाहेर येताच या माशानेही आपले पंख पसरवले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर एका बॉक्समध्ये हा मासा दिसतो आहे. बॉक्समध्ये पाणी नाही आहे. मासा आपल्या शरीराची थोडी हालचाल करतो, त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपले पंख पसरतो. अगदी फुलपाखरासारखे हे पंख आहे. त्यांचा आकार अगदी तसाच आहे. पंखाच्या कडेने निळ्या रंगाची बॉर्डर आणि पंखावर निळ्या रंगाचेच ठिपके आहेत.
क्षणभर या पंखांकडे पाहिल्यानंतर फुलपाखराचे असावेत असं वाटतं पण माशाकडे लक्ष जाताच माशाला पंख कसे काय असू शकतात, याचं आश्चर्य वाटतं.
हे वाचा - बापरे! एवढ्या फूट लांब पंख असलेलं गिधाड पाहिलं का? लोकांची सेल्फी काढण्यासाठी तुफान गर्दी
या व्हिडीओने प्रत्येकाला कोड्यात टाकलं आहे. याला निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला किंवा तुम्हाला याबाबत काही अधिक माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
तुमच्याकडेही असे काही अजब व्हिडीओ असतील तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Other animal, Viral, Viral videos