Home /News /national /

Shocking VIDEO: गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

Shocking VIDEO: गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, Shocking VIDEO आला समोर

गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, Shocking VIDEO आला समोर

Shocking video, explosion on gutter while buring firecracker: मॅनहोलवर फटाके फोडताना भडका उडाल्याने लागली आग. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    सुरत, 30 ऑक्टोबर : दिवाळीत (Diwali) फटाके (crackers) फोडण्याचा उत्साह लहान मुलांमध्ये असतो. तुम्हीही आपल्या मुलांना फटाके फोडण्यासाठी देत असात तर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याचं कारण म्हणजे आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात लहान मुले फटाके फोडत असताना अचानक भडका उडाला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ (Shocking video of explosion after burn crackers) पालकांना सतर्क करणारा आहे. गुजरातमधील सुरत (Surat Gujarat) येथे 5 लहान मुले गटाराच्या झाकणावर फटाके पेटवत होते आणि त्याच दरम्यान अचानक भडका उडाला. भडका उडाल्याने काही मुलांना दुखापतही झाली असल्याची माहिती समोर आली आहे. घराच्या बाहेर मुख्य रस्त्यावर असलेल्या गटाराच्या झाकणावर ही मुले फटाके पेटवत असताना ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना शेजारी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गटारात मलमूत्र, इतर कचरा आणि विष्ठा असल्याने ते एकत्र येऊन ज्वलनशील वायूची निर्मिती होते. फटाकेही ज्वलनशील असतात. गटारावर फटाके पेटवल्याने गटारातील वायूचा आगीसोबत संपर्क आल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, लहान मुले गटाराच्या झाकणावर फटाके फोडत आहेत. त्याच दरम्यान फडका उडाल्याने आगीच्या ज्वाळा जवळपास 2 ते 3 फूट उंचावर येताना दिसल्या. सुरतमधील गल्ली क्रमांत 7 जवळील सोसायटीबाहेर बुधवारी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना सतर्क करणारी असून पालकांनी आणि मुलांनी फटाके फोडताना विशेष काळजी घेणं किती आवश्यक आहे हे यावरुन लक्षात येतं. हिंगोलीत चिमुकल्याने डोळा गमावला फटाके फोडत असताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. असाच एक प्रकार हिंगोलीतून समोर आला आहे. फटाके फोडताना एका 9 वर्षीय मुलाने आपला डोळा गमावला आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात ही घटना घडली आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे 9 वर्षीय मुलगा फटाके फोडत होता. फटाके फोडत असताना तो फटाका फुटला आणि उडून थेट या चिमुकल्याच्या डोळ्याला लागला. पेटता फटाका डोळ्याला लागल्याने 9 वर्षीय साईनाथ घुगे याच्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेनंतर साईनाथ याला उपचारासाठी नांदेडमधील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पेटता फटाका डोळ्याला लागल्याने झालेल्या दुखापतीत साईनाथ याने डोळा गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Diwali 2021, Fire, Surat

    पुढील बातम्या