नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : कर्मचाऱ्यांना शक्यतो ऑफिसकडून असं सांगितलं जातं की फार महत्त्वाचं काम असेल तरच सुट्टी घ्या (Reasons for Leave). मात्र, लोकांच्या जीवनात अनेक अशी कामंही असतात, जी बॉसला फार महत्त्वाची वाटत नसली तरीही कर्मचाऱ्यांसाठी मात्र ती महत्त्वाचं असतात. त्यामुळे अशा गोष्टींसाठी सुट्टी मिळणंही कठीण जातं. अशावेळी कर्मचारी अजब कारणं देऊन सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एका व्यक्तीनं सुट्टी मिळवण्यासाठी असं कारण शोधून काढलं, जे ऐकताच बॉस भडकला (Employee Gives Weird Reason to take Leave). इतकंच नाही तर याचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला असून लोकही थक्क झाले आहेत की सुट्टी मिळवण्यासाठी कोणी असं कारण कसं देऊ शकतं. अपनी गल्ली में कुत्ताही शेर! कुत्र्याला घाबरून सिंहानेही ठोकली धूम; पाहा VIDEO इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये राहणाऱ्या केन मोर याने नुकतंच आपल्या एका कर्मचाऱ्याला मेसेज करून विचारलं की तो ऑफिसला कधी येणार आहे. केनची नेहमीच अशी इच्छा असते की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता ऑफिसला येत राहावं. मात्र, कर्मचाऱ्यानं रिप्लाय केला की त्याला त्याचे स्वच्छ मोजे सापडत नाहीत आणि त्याच्या गर्लफ्रेंडनं खराब झालेले मोजे (Dirty Socks) धुतले नाहीत. सोबतच त्यानं सांगितलं, की त्याचे शूज फाटलेले आहेत, त्यामुळे तो ते मोज्यांशिवाय घालू शकत नाही. हा मेसेज वाचून केन यांना प्रचंड राग आला, मात्र तरीही त्यांनी राग आवरत मेसेज केला की, तू मस्करी करत आहेस का? तू यासाठी ऑफिसला येत नाहीस, कारण तुझ्याकडे मोजे नाहीत? ही कसली चेष्टा आहे. उद्या भेटू. पण तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मी त्याला पुन्हा ऑफिसमध्ये येऊ दिलं नसतं. साडी नेसून ‘Manike Mage Hithe’ गाण्यावर धरला ठेका; Video चा इंटरनेटवर धुमाकूळ केनचा हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या. एकानं म्हटलं की बॅकपॅकर्स एकच मोजे न धुता सहा महिन्यांपर्यंत वापरतात. त्यामुळे तोदेखील खराब मोजे घालू शकत होता. दुसऱ्या एकानं म्हटलं, की रात्री नक्कीच त्यानं जास्त पार्टी केली असणार, म्हणूनच ऑफिसला न येण्यासाठी तो कारण शोधत आहे. दोन लोकांनी केनला असा सल्ला दिला की त्यानं या व्यक्तीला असं म्हणायला हवं होतं, की तू ऑफिसला ये आणि मी तुला नवे मोजे देतो. आणखी एकानं म्हटलं की केननं स्वतः नवे मोजे घेऊन या व्यक्तीच्या घरी जायला हवं होतं. यामुळे समजलं असतं की सत्य काय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.