जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दोरीच्या सहाय्याने चिखलाने भरलेला खड्डा पार करायला गेली अन्...; मुलीची फजिती पाहून खळखळून हसाल, VIDEO

दोरीच्या सहाय्याने चिखलाने भरलेला खड्डा पार करायला गेली अन्...; मुलीची फजिती पाहून खळखळून हसाल, VIDEO

दोरीच्या सहाय्याने चिखलाने भरलेला खड्डा पार करायला गेली अन्...; मुलीची फजिती पाहून खळखळून हसाल, VIDEO

Funny Video of Kids : व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं दोरीच्या सहाय्याने खेळताना दिसतात. यात एक व्यक्ती त्यांची मदतही करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 डिसेंबर : लहान मुलांना खेळण्याची आणि इकडून तिकडे उड्या मारण्याची प्रचंड आवड असते. प्रत्येक गोष्टीत ही मुलं काहीतरी खेळ शोधून काढतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे असे अनेक व्हिडिओ (Viral Videos of Kids) तुम्हाला पाहायला मिळतील. यात लहान मुलं खेळताना आणि मस्ती करताना दिसतील. यातील काही व्हि़डिओ भावनिकही असतात तर काही अतिशय विनोदी असतात. या व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंतीही मिळते. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे. यात लहान मुलं खेळताना दिसतात मात्र पुढच्याच क्षणी असं काही घडतं, ज्याचा विचारही त्यांनी केला नसेल. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. बापरे बाप! टॉयलेट सीटवर बसताच कमोडमधून बाहेर आला 5 फूट साप आणि… व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं दोरीच्या सहाय्याने खेळताना दिसतात. यात एक व्यक्ती त्यांची मदतही करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा दोरीच्या सहाय्याने चिखलाने भरलेला खड्डा अगदी आरामात पार करतो. यानंतर मुलगीही तशाच पद्धतीने दोरीच्या सहाय्याने चिखलाने भरलेला हा खड्डा पार करण्याचा प्रयत्न करते. मात्र सुरुवातीलाच तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती चिखलाने भरलेल्या या खड्ड्यात पडते. तिचं संपूर्ण शरीर चिखलाने भरतं. यानंतर ही मुलगी तिथून उठून निघून जाते.

जाहिरात

इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ lustigejoke नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, त्या मित्राला टॅग करा, ज्याने हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 64 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 2,400 हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. Real-life ‘Gully Boy’; मुंबईतील रिक्षाचालकाच्या रॅपर मुलीचा युट्यूबवर कल्ला अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, सुपरविलनचा जन्म इथेच झाला होता. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, की जाड लोकांसोबत नेहमी असंच होतं. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात