• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा ताबा! लग्नमंडप सोडून रस्त्यावर आली...; VIDEO पाहा

नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा ताबा! लग्नमंडप सोडून रस्त्यावर आली...; VIDEO पाहा

नवरी जोमात, नवरदेव कोमात.

नवरी जोमात, नवरदेव कोमात.

नवरीने असं काही केलं की नवरदेवही पाहतच राहिला.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट : लग्नामध्ये (Wedding video) प्रत्येक नवरी आपल्या नवरदेवाची (Bride groom video) उत्सुकतेने वाट पाहत असते. नवरदेव (Groom video) येताच त्याला पाहण्याची तिची इच्छा असते. पण एका नवरीला (Bride video) मात्र नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी उत्सुकता झाली ती स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत बसून नवरदेवाची प्रतीक्षा करत राहिली नाही. तर लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली (Bride dance video). सोशल मी़डियावर (Social media) लग्नाचा भारी व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत आहे. नवऱ्याला पाहून नवरीला इतका आनंद झाला की ती स्वतःच त्याच्या स्वागतासाठी आली. लग्नमंडप सोडून ती रस्त्यावरच धावत गेली आणि तिथं तिने धिंगाणा घातला.  तिने रस्त्यावर असं काही केलं की तिला पाहून नवरदेव तसाच स्तब्ध उभा राहिला. नवरीचं रूप पाहून त्याला काही सुचेना. व्हिडीओत पाहू शकता नवरदेव गाडीतून उतरला आहे. तो मंडपात जाणार त्याआधीच नवरी तिथं धावत आली आणि ती त्याच्यासमोर नाचू लागली. हे वाचा - लग्नाआधीच नवरी-नवरदेवामध्ये जुंपली; भरमंडपात एका रूमालासाठी लढाई; VIDEO VIRAL नवरदेवासमोर नवरीने ठुमके लगावले. अगदी बिनधास्त, जोशात ती नाचताना दिसते आहे. अगदी हटके पद्धतीने तिने नवरदेवाचं स्वागत केलं आहे. नवरीचं हे रूप पाहून नवरदेवही शॉक झाला.  मांडवदारी आलेल्या वरातील नवरीने भारीच डान्स केला. आयएफएस अधिकारी @pnarahari यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आगे. एक नवरी नवरदेवासाठी नाचते आहे. त्याला आपल्या आयुष्यात मिळवून ती खूप आनंदी दिसते आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - VIDEO: रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी; 'ते' वागणं पाहून नवरदेवही हैराण हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीस पडला आहे. नवरीचा डान्स, नवरदेवाचं स्वागत करण्याची तिची हटके स्टाइल आणि बिनधास्त अंदाज सर्वांना भावला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: