मराठी बातम्या /बातम्या /Viral /तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी फोटो काढायला आवडतं? मग या 'सेल्फी क्वीन'सोबत घडलेली विचित्र घटना बघाच, VIDEO

तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी फोटो काढायला आवडतं? मग या 'सेल्फी क्वीन'सोबत घडलेली विचित्र घटना बघाच, VIDEO

व्हिडिओमध्ये एक तरुणी कॅनॉलच्या काठावर उभी राहून वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी घेताना दिसते. मात्र इतक्यात तिच्यासोबत असं काही घडतं की ती थेट कॅनॉलमध्ये पडते

व्हिडिओमध्ये एक तरुणी कॅनॉलच्या काठावर उभी राहून वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी घेताना दिसते. मात्र इतक्यात तिच्यासोबत असं काही घडतं की ती थेट कॅनॉलमध्ये पडते

व्हिडिओमध्ये एक तरुणी कॅनॉलच्या काठावर उभी राहून वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी घेताना दिसते. मात्र इतक्यात तिच्यासोबत असं काही घडतं की ती थेट कॅनॉलमध्ये पडते

नवी दिल्ली 09 डिसेंबर :आजकाल लोकांमध्ये सेल्फी (Selfie) काढण्याचं क्रेज अतिशय वाढलं आहे. संधी मिळेल तिथे लोक सेल्फी काढायला सुरुवात करतात. अनेकदा सेल्फीच्या नादात मोठ्या दुर्घटनाही (Accident While Taking Selfie) घडतात. तर कधी कधी सेल्फी काढताना लोकांसोबत असं काही घडतं जे पाहून हसू आवरत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

ट्रेनपेक्षाही तेज! कुत्र्याचा वेग पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये एक तरुणी कॅनॉलच्या काठावर उभी राहून वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी घेताना दिसते. मात्र इतक्यात तिच्यासोबत असं काही घडतं की ती थेट कॅनॉलमध्ये पडते. तरुणीचा हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीये.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कॅनॉलच्या काठावर उभा आहे. ती आपल्या फोनमध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला कॅमेऱ्यात बघताच आनंदात ती नाचू लागते. उड्या मारत असतानाच अचानक तिचा बॅल्नस बिघडतो आणि ती थेट पाण्यात कोसळते. पाण्यात पडल्यानंतर या तरुणीचा ड्रेस आणि मोबाईल पूर्णपणे खराब होतो. पाण्यात पडल्यानंतर या तरुणीच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलतात.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, दिदी पुढच्या वेळी सेल्फी घेण्याआधी शंभर वेळा विचार करेल. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, या महिलेला भरपूर मार लागला असेल. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

बापरे! स्ट्रीट फूडमध्ये महिलेला सापडलं असं काही की VIDEO पाहून थरकाप उडेल

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. तब्बल 8700 हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

First published:

Tags: Selfie photo, Selfiy video