मुंबई, 08 डिसेंबर : सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता असं विचारलं तर साहजिकच याचं उत्तर आहे चित्ता. पण शिकार करायची म्हटली तर चित्त्याप्रमाणे बिबट्या, सिंह, वाघ या प्राण्यांचाही वेग तसा कमी नसतो. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) चर्चेत आला आहे तो वेगवान कुत्रा (Dog running). ज्याचा वेग पाहून सर्वजण थक्क झाले आहेत (Dog running video).
एखाद्या व्यक्तीच्या मागे किंवा एखाद्या गाडीच्या मागे कुत्र्याला (Dog video) पळताना तुम्ही पाहिलं असेल. पण यापेक्षा कितीतरी वेगाने कुत्रा धावू (Dog speed video) शकतो, हेच दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एक कुत्रा एका ट्रेनपेक्षाही वेगाने धावला आहे. तुम्हाला वाचून नक्कीच विश्वास बसणार नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पाहा. कदाचित व्हिडीओ पाहूनही तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता रेल्वे ट्रॅकसमोर काही कुत्रे उभे आहेत. इतक्यात त्या ट्रॅकवरून एक ट्रेन भरधाव वेगाने धावत येते. ट्रेनचा आवाज येताच कुत्र्यांचं लक्ष तिथं जातं. एक कुत्रा ट्रेन पाहताच पळत सुटतो.
हे वाचा - कोंबड्यांसमोर आधी भुंकला नंतर आवाजच बंद झाला; कुत्र्यासोबत काय घडलं पाहा VIDEO
जशी ट्रेन त्याच्या जवळ येते, तसा तोही त्या ट्रेनसोबत धावू लागतो. जणू त्याने ट्रेनसोबत धावण्याची स्पर्धाच लावली आहे. त्याच्या धावण्याचा वेग पाहून तर थक्कच व्हायला होतं. कारण जेव्हा हा कुत्रा धावू लागतो तोपर्यंत ट्रेन थोडीफार त्याच्या पुढे गेलेली असती. तरी कुत्रा त्या ट्रेनसोबत वाऱ्याच्या वेगाने इतका पळत जातो की तो अगदी ट्रेनच्या पुढे इंजिनपर्यंत पोहोचतो. last_dog_pack इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
हे वाचा - 'दूध देत नाही आता तुम्हीच समजवा', गाईची तक्रार घेऊन थेट पोलिसात पोहोचला शेतकरी
काही दिवसांपूर्वीच रेल्वे ट्रॅकवर धावणाऱ्या एका सशाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक छोटासा ससा ट्रेन येताच आपला जीव वाचवण्यासाठी ट्रॅकवरून वेगाने पळत सुटला होता. यानंतर या प्रेमळ जीवाला ट्रॅकवर पाहून आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेला त्याचा संघर्ष पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरनेही वेग थोडा कमी केला आणि हॉर्न वाजवून सशाला सावध करण्याचा प्रयत्न केला. हा ससा आपल्या जीव वाचवण्यासाठी पळत राहिला आणि अखेर त्यानं स्वतःचा बचाव केलाच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos