मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रेमात धोका दिलेल्या बॉयफ्रेंडला तरुणीकडून अजब शिक्षा; आता एकदा बोलण्यासाठी घेते 20 हजार रुपये

प्रेमात धोका दिलेल्या बॉयफ्रेंडला तरुणीकडून अजब शिक्षा; आता एकदा बोलण्यासाठी घेते 20 हजार रुपये

सोशल मीडियावर एका तरुणीनं आपल्या प्रियकरानं विश्वासघात केल्यानंतर आपण त्याला दुसरी संधी देण्यासाठी तयार झाल्याचं सांगितलं (Viral Weird Love Story), मात्र यात एक ट्विस्ट आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 सप्टेंबर : प्रेम (Love) हे एक असं नातं आहे, जे विश्वासावर टिकून असतं. प्रेमात धोका देणं म्हणजे हे नातं संपवणं. जर एकमेकांवर विश्वास नसेल तर नातंही फार काळ टिकत नाही. मात्र, तरीही काही लोक प्रेमात विश्वाघात करतात. तुम्ही अनेकांकडून असा सल्ला ऐकला असेल, की जर प्रेमात विश्वाघात झाला तर दुसरी संधी द्यायला नाही पाहिजे. मात्र, सोशल मीडियावर एका तरुणीनं आपल्या प्रियकरानं विश्वासघात केल्यानंतर आपण त्याला दुसरी संधी देण्यासाठी तयार झाल्याचं सांगितलं (Viral Weird Love Story), मात्र यात एक ट्विस्ट आहे.

पैसे अन् पिशवी घेऊन बाजारात पोहोचला कुत्रा; खरेदीचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

मिसौरीच्या (Missouri) केन्सास शहरात (Kansas City) राहणारी हाले पियर्स (Haley Pierce) हिनं लोकांना सांगितलं, की कशा प्रकारे आता ती आपल्या धोका देणाऱ्या प्रियकराला दुसरी संधी देऊन पैसे कमवत आहे. 20 वर्षीय हाले हिनं सांगितलं, की 2 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर तिलं समजलं की तिचा प्रियकर तिला धोका देत आहे. तो इतर मुलींसोबतही डेटिंग अॅपवर बोलत असे. हालेला आपल्या वाढदिवसादिवशीच याबाबत माहिती झालं. यानंतर तिनं ब्रेकअप केला.

ब्रेकअपनंतर काही काळातच तिचा प्रियकर परत आला. त्यानं हालेची माफी मागितली. त्यानं स्वतःला दोष देत दुसरी संधी मागितली. हालेनं आपल्या प्रियकराचे अनेक ऑनलाईन मेसेज वाचले होते. तो बऱ्याच महिलांसोबत फ्लर्ट करत असे. जेव्हा त्यानं हालेची माफी मागत तिच्याकडे दुसरी संधी मागितली तेव्हा तिनं एका अटीवर आपल्या प्रियकरासोबत पॅचअप केलं. आपल्या या अटीचा व्हिडिओ हालेनं ऑनलाईन शेअर केला आहे, जो आतापर्यंत 44 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.

VIDEO: पुलावरुन नदीत उडी घेत होता युवक; अचानक असं काही घडलं जे पाहून बसेल धक्का

हाले आपल्या प्रियकराला दुसरी संधी देऊन यातून भरपूर पैसे कमवत आहे. ती आता आपल्या प्रियकराकडून भेटण्यापासून चॅटिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीचे पैसे घेते. एकदा चॅट करण्यासाठी ती 20 हजार रुपये घेते. याशिवाय भेटण्याचे चार्ज वेगळे आहेत. हाले हिनं सांगितलं, की याच पैशातून ती आपल्या कॉलेजचा खर्च पाहते. सोबतच आपल्या कुटुंबीयांचीही मदत करते. ही बातमी समोर आल्यानंतर लोकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काहीजण या मुलीच्या बाजूनं बोलत आहेत, तर काहींनी ती स्वार्थी असल्याचं म्हटलं आहे. हालनं सांगितलं, की ती या कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही.

First published:

Tags: Love story, Viral news