लंडन 03 जानेवारी : अनेकांनी प्रेमात धोका (Cheating in Love) मिळाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. या घटना समोर येताच बहुतेक लोक प्रेमात धोका का मिळाला याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल. यात एका ब्रिटिश तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला यासाठी धोका दिला कारण तिला ऑस्ट्रेलियन अॅसेंट (Australian Accent) अधिक आवडायची. ती आपल्या 29 वर्षाच्या बॉयफ्रेंडसोबत गेल्या तीन वर्षांपासून राहात होती. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात एका ऑस्ट्रेलियन अॅसेंट असणाऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली.
मला 'असाच' पार्टनर पाहिजे! बॉयफ्रेंडसाठी तरुणीची विचित्र अट; मिळालं सडेतोड उत्तर
तरुणी या ऑस्ट्रेलियन अॅसेंट असलेल्या व्यक्तीकडे आकर्षित झाली. तिच्या बॉयफ्रेंडने स्वतः याबाबतची माहिती ब्रिटनच्या द सनच्या Dear Deidre कॉलमला दिली. Dear Deidre ब्रिटिश वृत्तपत्र होतं. द सन या नावाने कॉलमही लिहितं. याच कॉलममध्ये हा रिपोर्ट छापला गेला आहे. धोका देणाऱ्या तरुणीच्या बॉयफ्रेंडने सांगितलं की त्याची गर्लफ्रेंड खोटं बोलण्यात माहीर आहे.
ती जुन्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे. मात्र जेव्हा तिचं सत्य समोर आलं, तेव्हा मी हैराण झालो. इतकंच नाही तर माझी गर्लफ्रेंड दोन रात्र एका ऑस्ट्रेलियन तरुणासोबत राहिली. त्याने पुढे म्हटलं, मला असं वाटायचं की आमचं चांगलं नातं आहे. मात्र मला अनेकदा हे जाणवलं की ती माझ्यापेक्षा जास्त इतर तरुणांबद्दल बोलत असते.
तरुणाने सांगितलं, की गर्लफ्रेंडचं खोटं त्याने स्वतःच पकडलं. तरुणाने सांगितलं, की एक दिवस मी तिचा फोन हातात घेतला. फोन चेक केला असता मला समजलं की ती एका ऑस्ट्रेलियन तरुणाला डेट करत आहे. त्यांच्या चॅटवरुन त्याला हेदेखील समजलं की त्यांनी अनेकदा एकमेकांसोबत संबंधही ठेवले आहेत. या कृत्यासाठी तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडची माफीही मागितली आहे. मात्र तो या सदम्यातून अद्याप बाहेर आलेला नाही. आपली गर्लफ्रेंड संपूर्ण सत्य कधी सांगेल, याच विचारात तो आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.