नवी दिल्ली 03 जानेवारी : आपला जोडीदार कसा असावा याबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे विचार (Partner Choices) असतात. काहींना एकदम सडपातळ तर काहींना भारदस्त असलेले लोक आवडतात. काहींनी उंची कमी असलेले तर काहींना उंच लोक आवडतात. एका तरुणीचंही आपल्या बॉयफ्रेंडबद्दल असंच काहीसं स्वप्न होतं. मात्र नंतर तिला आपल्या चुकीबद्दल जाणवलं.
Online Sharing प्लॅटफॉर्म Reddit वर एका व्यक्तीने ही घटना शेअर केली आहे आणि सांगितलं की त्याने कशाप्रकारे या तरुणीला अद्दल घडवली. या तरुणीला आपल्यापेक्षा उंच व्यक्तीला डेट करण्याची इच्छा होती (Girl Wants to Date Tall Boy) . मात्र तिची स्वतःची उंची अतिशय कमी होती. या पोस्टला सोशल मीडियावर लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
बँक लॉकरमध्ये आढळलं 1000 वर्षे जुनं शिवलिंग; किंमत जाणून व्हाल अवाक
आपल्यासोबत घडलेली ही घटना शेअर करत तरुणाने सांगितलं की एका तरुणीसोबत त्याची डेटिंग अॅपवर ओळख झाली. दोघांची चॅटिंग सुरू झाली तेव्हा या तरुणीने एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याऐवजी या तरुणाला थेट त्याची उंची किती आहे हे विचारलं. या तरुणाने आपली उंची 6 फूट 3 इंच असल्याचं सांगताच ती अतिशय आनंदी झाली आणि ही परफेक्ट उंची असल्याचं तिने म्हटलं. हे वाचताच तरुणाला अंदाज आला की ही मुलगी केवळ दिसण्यालाच प्राधान्य देत आहे.
तरुणाने या संपूर्ण चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, की हे वाचल्यानंतर त्याने तरुणीला तिची उंची विचारली. या तरुणीची उंची 5 फूट 1 इंच इतकी होती. तरुणाने यावर उत्तर देत तिला म्हटलं की आपल्या उंचीत भरपूर अंतर आहे आणि त्यामुळे आपली जोडी चांगली दिसणार नाही.
हे उत्तर वाचून तरुणी हैराण झाली आणि तिने विचारलं की तू मला माझ्या उंचीमुळे रिजेक्ट करत आहेस का? यावर तरुणाने तिला तिच्या चुकीची जाणीव करून देत म्हटलं की तूदेखील असंच केलं आहेस आणि आपल्या प्रोफाईलमध्येच स्पष्ट लिहिलं आहेस की तुला ६ फुटाचाच मुलगा पाहिजे. या पोस्टला अनेकांनी पसंती देत हजारो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.