Home /News /viral /

'त्या' जेवणामुळे सुरू होताच कपलच्या Love Story चा END; कारण जाणून व्हाल थक्क

'त्या' जेवणामुळे सुरू होताच कपलच्या Love Story चा END; कारण जाणून व्हाल थक्क

एका तरुणीने नुकतंच डेटवर गेली असताना तिच्यासोबत घडलेली विचित्र घटना (Weird Experience of First Dating) सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  नवी दिल्ली 03 जानेवारी : डेटिंगच्या (Dating) माध्यमातून आजकालचे तरुण-तरुणी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून आयुष्यात एकमेकांसोबतचं बॉन्डिंग अधिक खास राहावं. मात्र अनेकदा या डेटिंगचा फायदा होतो तर अनेकदा हा अनुभव अतिशय वाईट असतो. एक तरुणीने नुकतंच डेटवर गेली असताना तिच्यासोबत घडलेली विचित्र घटना (Weird Experience of First Dating) सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  नोकरी सोडून महिलेनं सुरू केलं लोकांना रोमान्स शिकवण्याचं काम; करते बक्कळ कमाई

  निक नावाच्या तरुणीने आपल्या टिकटॉक अकाऊंटवरुन एका शॉर्ट व्हिडिओच्या (Short Video) माध्यमातून सांगितलं की तिची डेट कशाप्रकारे वाईट ठरली. तिने सांगितलं, की एका तरुणासोबत ती पहिल्यांदा डेटवर गेली असता तिला असा अनुभव आला की आता ती पुन्हा कधीच या तरुणासोबत डेटवर जाणार नाही. सोबतच हा तरुणही आता तिला पुन्हा भेटण्यासाठी अजिबातही तयार होणार नाही. @_nikk1 नावाच्या अकाऊंटवरुन या तरुणीनं सांगितलं की ती जोश नावाच्या एका तरुणाला डेटिंग अॅपवर भेटली होती आणि नंतर त्याच्यासोबत डेटवर गेली. त्यांचा संपूर्ण दिवस चांगला गेला आणि त्यांनी एकमेकांसोबत सहा तास घालवले. आधी या तरुणीने एका ठिकाणी रिझर्व्हेशन केलं होतं. तिथेच दोघांनी जेवण केलं आणि ड्रिंक्सही घेतले. या सुंदर डेटनंतर ते दोघंही दुसऱ्यांदा भेटण्याचा प्लॅन करत होते, मात्र हा तरुण अचानकच गायब झाला. तो निकच्या मेसेजला रिप्लायही देत नव्हता. बऱ्याच काळानंतर त्यानं सांगितलं की त्याला या तरुणीची ही गोष्ट अजिबात आवडली नाही की जेवण आणि ड्रिंक्सचं बिल देण्याच्या वेळी ती वॉशरूमला गेली आणि त्यालाच संपूर्ण बिल द्यावं लागलं.

  3 वर्षात 107 घरांमध्ये लागली रहस्यमयी पद्धतीने आग; कारण समोर येताच पोलीसही शॉक

  निकने सांगितलं की पहिल्या डेटवर ती या तरुणालाच बिल द्यायला सांगणार होती. मात्र तिचा असा उद्देश नव्हता की त्याचे पैसे खर्च व्हावे. तिने या संपूर्ण संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.1 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या तरुणीची बाजू घेतली आहे तर काहींचं असं म्हणणं आहे की या तरुणाकडे पुरेसा ट्रस्ट फंड नव्हता.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Love story, Online dating

  पुढील बातम्या