नवी दिल्ली 11 सप्टेंबर : प्रेमात विश्वास (Trust In Love) अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावरच हे प्रेमाचं नातं टिकून असतं. प्रेमात विश्वास नसेल तर कोणतंही नातं जास्त काळ टिकत नाही. मात्र, असं असूनही काही लोक प्रेमात धोका देणं सोडत नाहीत. अशाच एका प्रियकराचा कारनामा त्याच्या शेजाऱ्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडच्या अनुपस्थितीत एक दुसऱ्याच तरुणीला घरात घेऊन आला (Cheater Boyfriend). मात्र, त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend) घरी येताच युवकानं आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला अर्धनग्न अवस्थेतच घराच्या बाल्कनीमध्ये लटकवलं.
स्वतःचा DNA रिपोर्ट पाहून हादरली तरुणी; 19 वर्षांनी झाला धक्कादायक खुलासा
ही विचित्र घटना (Weird News) या युवकाच्या शेजाऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हे सर्व त्यानं नंतर ट्विटरवर अपलोड केलं आणि सध्या हे व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक तरुणी घराच्या बाल्कनीत लटकलेली दिसत आहे. ही मुलगी केवळ आपल्या अंतर्वस्त्रामध्ये दिसत आहे. तर, इमारतीच्या खाली बरेच लोक जमलेले दिसत आहेत. ही घटना कोलंबियामधील आहे. ही 7 सप्टेंबरला ट्विटवर शेअर केली गेली. अपलोड झाल्यानंतर काहीच तासात करोडो लोकांनी ही पोस्ट पाहिली. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एका घराच्या खाली एक तरुणी ओरडताना दिसते. मुलगी म्हणत आहे, की दरवाजा उघड, मला माहिती आहे की तू आतच आहेस. ही शेवटची वेळ आहे, की तू माझ्यासोबत असं काही करू शकशील. यानंतर घराच्या बाल्कनीमध्ये एक अर्धनग्न व्यक्ती दिसला. त्याच्यासोबत आणखी एक तरुणी दिसली. दोघंही अर्धनग्न अवस्थेतच होते. मिळालेल्या माहितीनुसार, खाली उभा असलेली मुलगी या व्यक्तीची गर्लफ्रेंड होती, तर दुसऱ्या मुलीलाही डेट करून तो तिला धोका देत होता.
महिलेनं BF ला दिलं 17 पानी रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट लेटर; डेटवर जाण्याआधी अजब मागणी
खाली उभा असलेली प्रेयसी दरवाजा उघडून वरती येऊ लागताच प्रियकरानं आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला बाल्कनीत लटकवलं. लोक ही संपूर्ण घटना खाली उभा राहून पाहत होते. कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद करून ट्विटवर शेअर केली. तरुणी आणि हा व्यक्ती दोघांनीही बाल्कनीतून खाली उडी घेतली आणि पाहता पाहता दोघंही गायब झाले. हा व्हिडिओ आतापर्यंत करोडोंनी पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.