• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • स्वतःचा DNA रिपोर्ट पाहून सरकली तरुणीच्या पायाखालची जमीन; 19 वर्षांनी झाला धक्कादायक खुलासा

स्वतःचा DNA रिपोर्ट पाहून सरकली तरुणीच्या पायाखालची जमीन; 19 वर्षांनी झाला धक्कादायक खुलासा

एका 20 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. (File Photo)

एका 20 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. (File Photo)

जर एखाद्या व्यक्तीला खूप वर्षांनी समजलं, की ज्यांना ती व्यक्ती आपले पालक समजत आहे, ते खरं तर आपले आई वडिलच नाहीत तर? सहाजिकच त्या व्यक्तीच्या पायाखालची जमिन सरकेल

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर : कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे आई-वडील जगातील सर्वात खास लोक असतात. जे मुलांना जन्म देतात आणि त्यांचा सांभाळही करतात. मुलं आपल्या आई -वडिलांसाठी आणि आई वडील आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला खूप वर्षांनी समजलं, की ज्यांना ती व्यक्ती आपले पालक समजत आहे, ते खरं तर आपले आई वडिलच नाहीत तर? सहाजिकच त्या व्यक्तीच्या पायाखालची जमिन सरकेल. असंच काहीसं घडलं स्पेनमधील (Spain News) एका 19 वर्षीय मुलीसोबत, जी रुग्णालयात मुलांची चुकून बदली (Baby Swap) झाल्यानं दुसऱ्याच महिलेच्या घरी पोहोचली. स्पेनच्या नॉर्दर्न ला रिओजा येथील सॅन मिलान डी रॉगरोने रुग्णालयात 2002 साली जन्मलेली एक मुलगी जेव्हा 19 वर्षाची झाली तेव्हा तिनं आपली डीएनए टेस्ट (DNA Test) केली. जेव्हा तिनं टेस्टचा रिपोर्ट पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. तिचा डीएनए आई आणि वडील या दोघांसोबतही मॅच होत नव्हता. युवतीनं मीडियापासून आपली ओळख लपवली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, साल 2017 मध्ये तरुणीच्या आई वडिलांमध्ये काहीतरी वाद सुरू झाला. यानंतर रागातच तरुणीनं आपली आणि वडिलांची टेस्ट करून घेतली. टेस्टमध्ये दोघांचा डीएनए मॅच झाला नाही. यानंतर तिनं आपल्या आईचीही चाचणी केली, यात समजलं की तिचा डीएनए आईसोबतही मॅच होत नाही. संकट दारावर! 'ते' 25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर बराच तपास केल्यावर हॉस्पिटलने इथल्या नोंदी तपासल्या आणि मग हॉस्पिटकडून एक मोठी चूक झाल्याचं उघड झालं. रुग्णालय प्रशासनानं सांगितलंे की एकाच दिवशी रुग्णालयात 5 तासांच्या अंतराने दोन कमकुवत बाळांचा जन्म झाला, ज्यामुळे दोघांनाही इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं आणि मग बाळांची बदली झाली. बाळं बदलल्याचा आरोप करत आता या तरुणीनं रुग्णालयावर 35 कोटीचा दावा ठोकला आहे. दुकानात बसलेला मुलगा; इतक्यात छतावरुन कोसळला कोब्रा अन्...; धडकी भरवणारा VIDEO तरुणीच्या वकिलांनी सांगितलं, की तरुणी पाच तासानंतर जन्मली होती. मात्र, जेव्हा मुलं पालकांकडे देण्याची वेळ आली तेव्हा तिला पाच तास आधीच जन्मलेल्या बाळाच्या आईकडे दिलं गेलं. रुग्णालयानं यासाठी मुलीची माफी मागितली आहे आणि ही मानवी चूक असल्याचं सांगितलं आहे. यासाठी नेमकं कोम दोषी आहे, हे आपल्याला माहिती नसल्याचं रुग्णालयानं म्हटलं. याआधी रुग्णालयात असं कोणतंही प्रकरण समोर आलं नसल्याचं रुग्णालयानं सांगितलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: