मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बंदिस्त होण्याआधी कोब्राने घेतला बदला, सर्पमित्रालाच दिला मृत्यू; Snake rescue चा थरारक VIDEO

बंदिस्त होण्याआधी कोब्राने घेतला बदला, सर्पमित्रालाच दिला मृत्यू; Snake rescue चा थरारक VIDEO

सापाच्या हल्ल्यात सर्पमित्राचा मृत्यू.

सापाच्या हल्ल्यात सर्पमित्राचा मृत्यू.

सापाच्या हल्ल्यात सर्पमित्राचा मृत्यू.

  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 01 ऑक्टोबर :  साप (Snake video) पकडतानाचे (Snake rescue video) बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहतानाच (Snake catcher video) आपल्याला घाम फुटतो. सर्पमित्र सापांना पकडून माणसांचा जीव तर वाचवतातच सोबतच त्या सापांनाही सुरक्षितस्थळी सोडतात. पण असं करताना ते आपला जीव धोक्यात टाकतात. असाच जीव धोक्यात टाकून कोब्राला पकडणाऱ्या एका सर्पमित्राचा मृत्यू झाला आहे (Kobra Snake attack on snake catcher).

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडामध्ये (Chhindwara) कोब्रा सापाने सर्पमित्रावर हल्ला केला (Snake catcher died after snake bite). कोब्राला पकडल्यानंतर त्याने दंश केला आणि त्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे.  या खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

" isDesktop="true" id="611977" >

संतराम असं या मृत सर्पमित्राचं नाव आहे.  व्हिडीओत पाहू शकता त्याच्या हातात एक लांब कोब्रा आहे. सापाला पकडताना त्याने स्वतःच्या संरक्षणाची पुरपूर काळजीही घेतली आहे. त्याने हातात ग्लोव्ह्ज घातलेले दिसत आहेत. त्याने सापाला दोन हातात पकडलं आहे.

हे वाचा - एका नागिणीसाठी 3 साप घायाळ; जबरदस्त फायटिंगनंतर मादीने...; काय घडलं पाहा VIDEO

या व्यक्तीने सापाला पकडलं खरं पण साप नियंत्रणात काही येईना.  थोड्या वेळाने ही व्यक्ती सापाला एका डब्यात बंदिस्त करायला जाते. सापाचं तोंड एका हातात धरून दुसऱ्या हाताने शेपटी डब्यात सोडेत. तेव्हा साप अधिकच आक्रमक होतो. तो या व्यक्तीच्या हाताला वेटोळे घालतो. त्याला चावण्याचा प्रयत्न करतो आणि संधी मिळताच साप त्या व्यक्तीला दंशही करतो.

यानंतरही संतराम सापाला सोडत नाही. कसंबसं करून तो सापाला त्या डब्यात बंदिस्त करतो. यानंतर यानंतर संतरामची प्रकृती बिघडली. तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - विमानतळावर पुन्हा घुसलं माकड, फूड प्लाझामध्ये घातला धुमाकूळ; पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये अशाच एका सर्पमित्राचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. रक्षाबंधनदिनी ही धक्कादायक घटना घडली. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीकडून सापाला राखी बांधून घेणं या युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. पायाच्या बोटाला सापानं चावा घेतल्यानं मनमोहन नावाच्या या तरुणाचा मृत्यू झाला.

" isDesktop="true" id="611977" >

25 वर्षाच्या मनमोहन उर्फ भूअरनं अनेक विषारी सापांना रेसक्यू केलं होतं. सारण जिल्ह्यातील मांझी ठाणा क्षेत्रात रक्षाबंधनदिनी तो दोन नागांची शेपटी पकडून आपल्या बहिणीकडून या नागांना राखी बांधून घेत होता. इतक्यात सापानं मनमोहनच्या पायाच्या बोटाला चावा केला आणि त्याचा मृत्यू झाला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Snake, Snake video, Viral, Viral videos