नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : अलीकडेच ब्रिटनमधून एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका तरुणीने तिच्या कुत्र्यासाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. तिने त्यात आपल्या प्रियकरालाही आमंत्रित केलं होतं. या पार्टीत मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते मात्र काही कारणास्तव तिचा प्रियकर पार्टी मध्येच सोडून निघून गेला. त्यानंतर जे घडलं, ते अतिशत थक्क करणारं होतं. त्याचं झालं असं की, कुत्र्याची बर्थडे पार्टी मध्येच सोडून गेलेल्या प्रियकराला तरुणीने असा धक्का दिला की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. शॉपिंग मॉलमध्ये चोरी करून महिलेनं कपड्यांमध्ये लपवलं सामान; झडती घेताच सगळेच शॉक, VIDEO मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण थोडं जुने आहे, परंतु अलीकडेच एका सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जेव्हा लोकांनी या ब्रेकअपचं खरं कारण सांगितलं, तेव्हा हे प्रकरण पुन्हा व्हायरल झालं. झालं असं की, एक तरुणी तिच्या एका पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार करत होती आणि त्यासाठी तिने खूप तयारी केली. वाढदिवसासाठी तरुणीने तिच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि प्रियकरालाही बोलावलं होतं. याशिवाय तिच्या आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलावलं होतं. ती दरवर्षी आपल्या श्वानाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करते. मात्र यावेळी हा एका मोठ्या समस्येचं कारण ठरला. ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत सीरियस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, तिचा प्रियकर तिला कधी कधीच भेटू शकायचा नवरीच्या डोक्यावरील केस बघताच हादरला; नवरदेवाचा मंडपातच धक्कादायक निर्णय पार्टी सुरू झाल्यावर तरुणीचा प्रियकरही आला पण अचानक तो लवकर पार्टीतून निघून गेला. काही लोकांनी तरुणीला सांगितलं की, त्याला ही पार्टी आवडत नाही, त्यानंतर तरुणीचा पारा चढला. यानंतर तरुणीनं थेट सोशल मीडियावरच आपल्या ब्रेकअपची घोषणा केली. सध्या दोघंही वेगळे राहात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.