जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवरीच्या डोक्यावरील केस बघताच हादरला; नवरदेवाचा मंडपातच धक्कादायक निर्णय

नवरीच्या डोक्यावरील केस बघताच हादरला; नवरदेवाचा मंडपातच धक्कादायक निर्णय

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

लग्नाचं आणखी एक अजब प्रकरण समोर आलं आहे. ज्यात नवरीच्या डोक्यावरील केस पाहून नवरदेवाला धक्का बसला आणि ऐनवेळी त्याने अतिशय धक्कादायक निर्णय घेतला.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 24 फेब्रुवारी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. मात्र अनेकदा लग्न सुरू असताना किंवा वरात दारात आल्यावर असं काही घडतं, की क्षणात हा आनंद दुःखात बदलून जातो. आता लग्नाचं असंच आणखी एक अजब प्रकरण समोर आलं आहे. ज्यात नवरीच्या डोक्यावरील केस पाहून नवरदेवाला धक्का बसला आणि ऐनवेळी त्याने अतिशय धक्कादायक निर्णय घेतला. हे अजब प्रकरण उत्तर प्रदेशच्या अयोध्येतून समोर आलं आहे. भयानक! डान्स ठरला मृत्यूचं कारण; लग्नमंडपातच जबरदस्त भांडण, हाणामारीत एकाचा मृत्यू या घटनेमध्ये नवरदेव अचानक मंडपातून फरार झाला. लग्नासाठी बराच वेळ त्याचा शोध घेतला गेला. मात्र नवरदेव सापडला नाही. या सगळ्यात आश्चर्यकारक बाब म्हणजे नवरीच्या डोक्यावरील केस पाहून नवरदेव मंडपातून फरार झाला होता. लग्न मंडपात गेल्यावर नवरदेवाला नवरीच्या डोक्यावर कमी केस असल्याचं दिसलं. यानंतर त्याने लग्न मंडपातून थेट पळ काढला. यामुळे हे लग्न होऊ शकलं नाही. नवरीकडील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरीच्या डोक्यावर कमी केस असल्याची माहिती आधीच नवरदेवाकडील लोकांना देण्यात आली होती. तरीही ऐनवेळी नवरदेवाने मंडपातून पळ काढल्याने कुटुंबीयांसह पाहुण्यांना मोठा धक्का बसला. लग्नातील कार्यक्रमांसाठी बराच वेळ नवरदेवाचा शोध घेण्यात आला. मात्र नवरदेव न सापडल्यानं वरातही रिकाम्य हातीच परत गेली. या घटनेनंतर नवरीच्या घरच्यांनी नवरदेवाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही वरात सुलतानपूरच्या कुरेभार येथून आली होती. लग्न सुरू असतानाच अचानक आल्या नवरदेवाच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्स; नवरीसमोरच नको ते घडलं, अन् मग… आनंद कनौजिया असं फरार झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. नवरीकडील लोकांनी असा आरोप केला आहे, की नवरदेवाने पैशांची मागणी केली होती. जी पूर्ण न झाल्याने नवरदेव मंडपातून फरार झाला आणि त्याने हे लग्न मोडलं. दरम्यान हे प्रकरण सध्या परिसरात चर्चेचा विषय़ ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात