जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शॉपिंग मॉलमध्ये चोरी करून महिलेनं कपड्यांमध्ये लपवलं सामान; झडती घेताच सगळेच शॉक, VIDEO

शॉपिंग मॉलमध्ये चोरी करून महिलेनं कपड्यांमध्ये लपवलं सामान; झडती घेताच सगळेच शॉक, VIDEO

शॉपिंग मॉलमध्ये चोरी करून महिलेनं कपड्यांमध्ये लपवलं सामान; झडती घेताच सगळेच शॉक, VIDEO

या व्हिडिओमध्ये एक महिला जीन्स टॉप घातलेली दिसत आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सुरक्षा रक्षकाने संशयास्पद वाटणाऱ्या या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे एकाच वेळी पाच पॅन सापडले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : सोशल मीडियावर आपल्याला अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांत चोरीचे अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. ते पाहिल्यानंतर यूजर्सचं डोकंही चक्रावून जातं. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चोरी करताना दिसत आहे. महिलेचा चोरीचा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. Shocking Video : ब्रेकऐवजी चुकून दाबला एक्सीलेटर अन् तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला दिसत आहे. ती शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चोरी करताना दिसते. चोरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ज्यामध्ये काही लोक आश्चर्यकारक पद्धतीने चोरी करताना दिसतात. ज्याचे सीसीटीव्ही फुटेज सर्वांनाच हैराण करून सोडतात. असाच आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

जाहिरात

सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर Valeranísimo नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला जीन्स टॉप घातलेली दिसत आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सुरक्षा रक्षकाने संशयास्पद वाटणाऱ्या या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे एकाच वेळी पाच पॅन सापडले. ती कपड्यात लपवून पॅन चोरण्याचा प्रयत्न करत होती. रात्रीच्या वेळी विना कपडे रस्त्यावर फिरत होती महिला, रहस्यमय घटनेचा Video Viral सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत सोशल मीडियावर ३७ हजारांहून अधिक लाईक्स आणि ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. महिलेची चोरी करण्याची स्टाईल पाहून एका यूजरने कमेंट करत लिहिलं, ‘कदाचित शूजमध्ये 64 इंच प्लाझ्मा लपला होता.’ दुसर्‍याने कमेंट करून लिहिलं, ‘मी कधीच कुठल्या स्त्रीला पॅनच्या सेटला जन्म देताना पाहिलं नाही.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात