नवी दिल्ली 04 मार्च : काही लोक आपलं आयुष्य अशा मजेशीर रीतीने जगतात की पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटतं! आपल्यापैकी अनेकांना आपल्या आनंदासाठी पाऊल टाकण्यापूर्वी दहा वेळा विचार करण्याची सवय असते. मात्र एका मुलीने आपल्या मौजमजेसाठी अज्ञात पुरुषांना आमंत्रित करून पार्टी करण्यास सुरुवात केली. तिने एका वर्षात अशा 17 पार्ट्यांचं आयोजन केलं आणि भविष्यातही ती हेच सुरू ठेवू इच्छिते. पोटच्या लेकीनेच दिला आईला धोका; तरुणीने वडिलांसोबतच बांधली लग्नगाठ, ती पोस्ट पाहून भडकले नेटकरी कॅसिडी डेव्हिस असं या मुलीचं नाव असून ती अमेरिकेची आहे. 5 वर्षांपासून कॅसिडीने स्वतःसाठी प्रियकराच्या शोधात लॉस एंजेलिसमधील अनेक अविवाहित मुलांना डेट केलंय. परंतु तिला कोणीही मनासारखं मिळालं नाही. डेव्हिस स्वतः एक अभिनेत्री आहे आणि तिने कलाकार, जादूगार आणि संगीतकारांना देखील डेट केलं आहे. 2022 मध्ये, व्हॅलेंटाइन डेच्या आधी तिला एक छान कल्पना आली आणि तिने तिच्या घरी एक सिंगल्स पार्टी आयोजित केली. डेव्हिसने स्वतः डेटिंग अॅप डिलीट केलं होतं. नंतर तिच्या मित्रांना तिला डेटिंग अॅपद्वारे भेटलेल्या मुलांना आमंत्रित करण्यास सांगितलं. कोणी येईल की नाही हे तिला माहित नव्हतं, म्हणून डेव्हिसने स्वतः 65 पुरुषांना बोलावलं, ज्यांच्याशी तिची ती डेटिंग अॅपद्वारे ओळख झाली होती. तिने त्या व्यक्तीलाही पार्टीसाठी आमंत्रित केलं ज्याला ती बारमध्ये भेटली होती आणि तिला तो तरुण आवडला होता. त्यानंतर बोलताना त्यांना समजलं की दोघंही एकमेकांना आवडतात. तेव्हापासून, म्हणजेच गेल्या एका वर्षापासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. डेविसला सिंगल्स पार्टीची आपलीच आयडिया इतकी आवडली की ती आजही ही पार्टी आयोजित करते. 6 महिने केली चॅटिंग, समोर भेटल्यावर तरुणीसोबत घडलं भयंकर डेव्हिसच्या या पार्ट्या फक्त लॉस एंजेलिसमध्ये होतात आणि 2022 मध्येच तिने 17 पार्ट्या आयोजित केल्या आहेत. तिथे प्रवेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यात डेटिंग अॅपवर भेटलेल्या व्यक्तीला कॉल करून याठिकाणी समोरासमोर भेट होते. ती टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर तिच्या पार्टीसाठी लोकांना आमंत्रित करते आणि तिच्या व्हिडिओंना लोकांकडून खूप पाठिंबा मिळतो. याचं तिकीट 1000 ते 3000 रुपयांपर्यंत असून शेकडो लोक यात सहभागी होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.