नवी दिल्ली 04 मार्च : ‘इथली नाती किती विचित्र असतात’, या गोष्टी तेव्हा लक्षात येतात जेव्हा लोकं नात्यामध्ये अशा प्रकारे गोंधळ घालतात की कोणीही चक्रावून जाईल. पण लोक त्यांचा निर्णय हा जगातील सर्वोत्तम निर्णय म्हणून सांगायला कमी पडत नाहीत. अशीच एक कथा आहे एका मुलीची, जिने आपल्या वडिलांना आपला पती बनवलं आणि दोन मुलांना जन्म दिला. आईसोबत केलेल्या या फसवणुकीला ती जगातील सर्वोत्तम निर्णय म्हणते आणि ती तिच्या पतीसोबत खूप आनंदी आहे. अजब प्रकरण! 2 विवाहित महिलांचं एकमेकींच्या पतीवर जडलं प्रेम; शेवटी घेतला असा निर्णय की सगळेच शॉक लास वेगासची रहिवासी असलेल्या क्रिस्टीने तिच्या वडिलांसोबत लग्न केल्यानंतर स्वतः भाग्यवान असल्याचं सांगितलं. खरं तर, तिचा नवरा तिच्या आईचा माजी पती आहे. पण आता तिचा सावत्र बाप तिचा नवरा झाला आहे, ज्याच्यासोबत तिला दोन मुलंही आहेत. या अजब प्रकरणामुळे महिलेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
वास्तविक ज्या व्यक्तीसोबत क्रिस्टीनं लग्न केलं, ती व्यक्ती तिच्या आईचा आधीचा पती होता. म्हणजे तिचा सावत्र बाप. त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि बाप-लेकीवरून हे नातं पती-पत्नीमध्ये बदललं. अलीकडेच क्रिस्टी नावाच्या महिलेनं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय सोशल मीडियावर सर्वांसोबत शेअर केला, ज्यानंतर तिला प्रचंड ट्रोल केलं जाऊ लागलं. आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने #MarryYourMomsEx नावाने एक व्हिडिओही शेअर केला, जो पाहून सगळेच चक्रावले.
लोकांना आश्चर्य वाटलं की तिने तिच्या आईच्या माजी पतीशी किंवा तिच्या सावत्र वडिलांशी लग्न करून तिच्या आईची फसवणूक केली. हे करूनही ती उघडपणे तिच्या या विचित्र नातेसंबंधाचा आनंद साजरा करत आहे. क्रिस्टीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिच्या सावत्र वडिलांना किस करताना दिसत होती. 6 महिने केली चॅटिंग, समोर भेटल्यावर तरुणीसोबत घडलं भयंकर ट्रोलर्सनी क्रिस्टीला फटकारले आणि ही तिच्या आईसोबतची मोठी फसवणूक असल्याचं म्हटलं. ज्याबद्दल क्रिस्टीने लगेच स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की आई या नात्यामुळे खूप आनंदी आहे आणि तिनेच हे फोटो क्लिक केले आहेत. तिने सिक्वेल पोस्टला कॅप्शन दिलं, “त्यांनी मला जन्म दिला का? नाही”, माझ्या सावत्र वडिलांनी मला वाढवलं का? नाही. “मी त्यांना भेटले तेव्हा मी अल्पवयीन होतो का? नाही." “माझी आई आणि मी अजूनही बोलतो का? हा. महिलेनं स्पष्ट केलं, की तिच्या लग्नाच्यावेळी तिची आई आणि सावत्र वडिलांची मुलंही नव्हती. अशात तिचं वडिलांसोबतचं नातं अजिबात चुकीचं नाही, तसंच तिने काहीही चुकीचं केलं नाही.