जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 6 महिने केली चॅटिंग, समोर भेटल्यावर तरुणीसोबत घडलं भयंकर

6 महिने केली चॅटिंग, समोर भेटल्यावर तरुणीसोबत घडलं भयंकर

ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन फसवणूक

आजकालच्या ऑनलाईन जगात सर्व काहीच ऑनलाईन झालं आहे. खरेदी करण्यापासून तर एखाद्यासोबत बोलण्यापर्यंत आपण सर्वच ऑनलाईन करताना दिसून येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 मार्च : आजकालच्या ऑनलाईन जगात सर्व काहीच ऑनलाईन झालं आहे. खरेदी करण्यापासून तर एखाद्यासोबत बोलण्यापर्यंत आपण सर्वच ऑनलाईन करताना दिसून येतो. सोशल मीडियाचं क्रेझही वाढत चाललं आहे. सोशल मीडियाचा जेवढा फायदा आहे तेवढाच तोटाही. आजकालचे तरुण सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणी बनवण्यापासून प्रेमदेखील ऑनलाईन करत आहे. मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली अनेकांची फसवणूकही होत आहे. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला असून एका तरुणीची सोशल मीडियावर चांगलीच फसवणूक झाली आहे. हे प्रकरण थोडं जुनं असलं तरी नुकतंच ते पुन्हा चर्चेत आलं आहे. ही घटना ऑस्ट्रेलियातून समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलगी सोशल मीडियावर सहा महिन्यांपासून डेटिंग अॅपद्वारे न्यूझीलंडच्या एका मुलाला ऑनलाइन डेट करत होती. दरम्यान दोघांनी भेटण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी न्यूझीलंडमधील एक हॉटेलही ठरवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा महिन्यांत त्यांनी फक्त चॅट केली होती. दोघांनीही एकमेकांचा आवाज ऐकला नाही आणि एकमेकांना व्हिडिओ कॉलही केला नाही. एक गोष्ट अशीही आहे की जेव्हा त्या मुलीने व्हिडिओ कॉलिंगसाठी विचारले तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून टाळले गेले. मुलीला हे विचित्र वाटायचे पण ती त्याकडे दुर्लक्ष करायची. हेही वाचा -  बॉसने फोन करताच महिला कर्मचाऱ्याने केलं ब्लॉक, कारण वाचून व्हाल थक्क ठरलेल्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या मुलीला समोरही मुलगीच असल्याचं समजलं. ती समोर एका मुलगा असेल असं गृहित ठरत होती आणि समोर भेटण्यासाठी मुलगी आली. तीने त्या मुलीला माझ्यासोबत असं का केलं विचारल्यावर ती म्हणाली, मला खात्री करायची होती की मला असं काही करता येतं का?. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर ओळख निर्माण करणे कधी कधी चांगलंच अगंलट येतं. अनेकदा ऑनलाईन मैत्री करुन लोक मोठा गंडा घालतात. सोशल मीडियावर अनेक प्रेम प्रकरणे फुलतात मात्र भेटल्यानंतर समोर काहीतरी भलतंच घडतं. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात