मराठी बातम्या /बातम्या /Viral /

टाईट जिन्स घालून बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणं पडलं महागात; 8 तासांनी तरुणीची झाली भयंकर अवस्था

टाईट जिन्स घालून बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणं पडलं महागात; 8 तासांनी तरुणीची झाली भयंकर अवस्था

सॅमनं आपल्या प्रियकरासोबत डेटवर (Date With Boyfriend) जाताना टाईट पॅन्ट घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, टाईट जिन्स घालून चालल्यामुळे तिच्या मांडीला जखमा झाल्या (Injury By Tight Jeans).

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : जगातील जवळपास प्रत्येक मुलीला वेगवेगळी फॅशन (Fashion) करणं आवडतं. प्रत्येकीची अशी इच्छा असते, की ती खूप सुंदर दिसावी. विशेषतः जेव्हा ती आपल्या प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जात असते, तेव्हा तर आपल्या लूकबाबत मुली विशेष काळजी घेतात. मात्र, सॅम नावाच्या एका तरुणीला डेटवर जाताना टाईट जिन्स घालणं चांगलंच महागात पडलं. सॅमनं आपल्या प्रियकरासोबत डेटवर (Date With Boyfriend) जाताना टाईट पॅन्ट घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, टाईट जिन्स घालून चालल्यामुळे तिच्या मांडीला जखमा झाल्या (Injury By Tight Jeans). या जखमेनं इतकं भयानक रूप घेतलं की सॅमला डेटनंतर काहीत दिवसात थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं, डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये अॅडमिट केलं.

प्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का

सॅमनं आपल्यासोबत झालेली ही घटना टिकटॉकवर (TikTok) शेअर केली आहे. डेटवरुन परत आल्यावर तरुणीला असं इन्फेक्शन झालं की थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. तिचं इन्फेक्शन इतकं वाढलं की थेट आयसीयूमध्ये भर्ती करावं लागलं. आपल्या अवस्थेबाबत सॅमनं सांगितलं, की डेटवरुन आल्यानंतर काही दिवसातच तिला आपल्या कमरेखालचा भागच नसल्याचं जाणवू लागलं. तिची अवस्था इतकी वाईट झाली की काहीच दिवसात तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

सॅम आपल्या प्रियकरासोबत डेटवर गेली होती. यादरम्यान तिनं अत्यंत टाईट पॅन्ट घातली होती. आठ तास तिनं ही जिन्स घातली. यानंतर जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या कमरेच्या खालच्या भागात वेदना होऊ लागल्या. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. सुरुवातीला तिला अँटीबायोटिक दिल्या गेल्या. डॉक्टरांना वाटलं, की तिला फक्त स्किन इनफेक्शन झालं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचंच औषध दिलं. मात्र, सॅमची अवस्था सुधारली नाही.. दुसऱ्याच दिवशी तिला चालण्यातही अडचण येऊ लागली.

हत्तीला कधी KISS करताना पाहिलंय का? मग हा Viral Video एकदा बघाच

सॅम जेव्हा दुसऱ्या डॉक्टरकडे गेली तेव्ही डॉक्टरांनी तिच्या पायाची अवस्था पाहताच तिला आयसीयूमध्ये भर्ती केलं. डॉक्टरांनी सांगितलं, की तिला सेप्सिस आणि सेलुलिटिस झालं होतं. इन्फेक्शन थांबवण्यासाठी तिला लगेचच आयसीयूमध्ये भर्ती केलं गेलं. मात्र, सुदैवानं तिची सजर्री करावी लागली नाही. आपल्या या अवस्थेबाबत सॅमनं सांगितलं, की तिला डॉक्टरांना आपली पॅन्ट काढून ही जखम दाखवावी लागत होती. आता सॅम बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.

First published:

Tags: Fashion, Shocking news