मराठी बातम्या /बातम्या /Viral /हत्तीला कधी KISS करताना पाहिलंय का? मग हा Viral Video एकदा बघाच

हत्तीला कधी KISS करताना पाहिलंय का? मग हा Viral Video एकदा बघाच

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हत्ती एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात. यानंतर आपली सोंड हवेत फिरवत एकमेकांना किस करतात.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हत्ती एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात. यानंतर आपली सोंड हवेत फिरवत एकमेकांना किस करतात.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हत्ती एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात. यानंतर आपली सोंड हवेत फिरवत एकमेकांना किस करतात.

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : अनेकदा तुम्ही सर्वांनी हत्तीचे क्यूट व्हिडिओ (Cute Videos of Elephant) पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ असेही असतील जे वारंवार पाहण्याची इच्छा होते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर सध्या दोन हत्तींचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ते एकमेकांना किस (Elephant Kissing Video) करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. असे व्हिडिओ खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे असा व्हिडिओ कदाचित याआधी तुम्ही कधीही पाहिला नसेल.

नखरे करणाऱ्या नवऱ्याला पत्नीनं शिकवला धडा; आधी कानशिलात लगावली अन् मग..., VIDEO

19 सेकंदाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हत्ती एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात. यानंतर आपली सोंड हवेत फिरवत एकमेकांना किस करतात.

हा व्हिडिओ केन्या येथील शेल्ड्रिक वाईल्ड लाईफ ट्रस्ट संघटनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही संघटना हत्तींना वाचवण्याचं, त्यांना नवं आयुष्य देण्याचं आणि अनाथ हत्तीच्या पिल्लांची काळजी घेण्याचं काम करते. या व्हिडिओला एलिफंट्स किसिंग असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

Server Down होताच बाप-लेकाचा जुगाड; क्रिकेट कॉमेंट्रीमधून साधला एकमेकांशी संवाद

हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या भलताच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत याला 17 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 3 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की हा हत्तींचा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, आतापर्यंत मी पाहिलेल्या व्हिडिओमधील सर्वात सुंदर व्हिडिओ. आणखी एका यूजरनं लिहिलं, मी असा क्यूट व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Elephant, Video Viral On Social Media