मराठी बातम्या /बातम्या /Viral /घर सोडून 40 उंटासोबत वाळवंटात राहू लागली महिला; जगते असं आयुष्य की जाणून व्हाल हैराण

घर सोडून 40 उंटासोबत वाळवंटात राहू लागली महिला; जगते असं आयुष्य की जाणून व्हाल हैराण

जर्मनीची रहिवासी असलेली उरसुला मूश अनेक वर्षांपूर्वी दुबईत फिरण्यासाठी गेली. ती एका आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकीण होती.

जर्मनीची रहिवासी असलेली उरसुला मूश अनेक वर्षांपूर्वी दुबईत फिरण्यासाठी गेली. ती एका आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकीण होती.

जर्मनीची रहिवासी असलेली उरसुला मूश अनेक वर्षांपूर्वी दुबईत फिरण्यासाठी गेली. ती एका आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकीण होती.

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : प्रत्येक माणसाला नवनवीन जागा पाहायला आणि फिरायला भरपूर आवडतं. लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात आणि याठिकाणांहून वेगवेगळ्या आठवणी सोबत घेऊन येतात. मात्र काही लोक असेही असतात ज्यांना या जागा इतक्या आवडतात की ते वारंवार त्याठिकाणी जाऊ लागतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जी पर्यटक म्हणून वाळवंटात फिरण्यासाठी गेली पण ती जागा आवडल्याने आपलं घर सोडून तिथेच राहू लागली (German Woman Living in Dubai Desert).

VIDEO : पंगा घेणं दिराला पडलं महागात; नवरीनं शिकवला असा धडा की झाला अवाक

जर्मनीची रहिवासी असलेली उरसुला मूश अनेक वर्षांपूर्वी दुबईत फिरण्यासाठी गेली. ती एका आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकीण होती. तिला दुबईमधील वातावरण आणि विशेषतः तेथील उंट इतके आवडले की तिनं तिथेच राहण्याचा निर्णय घेतला (Woman loves Camel lives in Dubai Desert). 1998 मध्ये ती आपलं घर सोडून 3900 मील दूर दुबईत गेली आणि तिथे तिने 40 उंट खरेदी केले.

आज ती दुबईमधील एक प्रसिद्ध उंटांची मालकीण आहे. तिला दुबईची कॅमल क्वीन (Camel Queen of Dubai) म्हणून ओळखलं जातं. तिनं रेगिस्तानातच Kamel Uschi Dubai ची सुरुवात केली. हे एक असं फार्म आहे जे प्राण्यांना पाळतं सोबतच वाळवंटातच फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना हॉटेलची सुविधा उपलब्ध करून देते. उरसुला जिथे राहते तिथे लाईटही नाबी आणि सतत पाण्याची व्यवस्थाही नाही. तिथे कसल्याही आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत.

जगातील सर्वात 'Premature Baby’ होऊन या बाळाने रचला इतिहास; 21व्या आठवड्यात जन्म

दुबईच्या बाहेर रेगिस्तानी भागात राहणाऱ्या उरसुलाला तेथील लोक म्हणतात की ती तेथील मूळ रहिवासी असलेल्या बेदुइन लोकांपेक्षा अधिक अरबी आहे. तिनं सांगितलं, की जेव्हा ती पहिल्यांदा दुबईमध्य आली तेव्हाच तिला वाटलं की तिला कायम इथेच राहायचं आहे. तिनं कधी विचारही केला नव्हता की ती आपलं घर सोडून २३ वर्ष दुबईत राहील. तिचं उंटांवर प्रेम असून हळूहळू ती आपला व्यवसाय वाढवत आहे. तिच्या फार्मची भरपूर प्रसिद्धी असून अनेक पर्यटक तिथे राहण्यासाठी येतात.

First published:

Tags: Camel, Dubai