• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • VIDEO - ...आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

VIDEO - ...आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

मगरीचा महिलेवर भयंकर हल्ला.

मगरीचा महिलेवर भयंकर हल्ला.

मगरीला पुन्हा पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न महिलेला महागात पडला.

  • Share this:
    सॉल्ट लेक सिटी, 17 ऑगस्ट :  प्राणीसंग्रहालयात (Zoo) आपल्याला क्वचितच दिसणारे असे जंगली, हिंस्र प्राणी पाहायला मिळतात (Animal video). इतक्या जवळून प्राण्यांना पाहताना त्यांच्या अधिक जाण्याचा मोहही होतोच. हे प्राणी पाळल्यासारखेच आहेत, त्यामुळे आपल्याला काही करणार नाहीत. यांच्यापासून आपल्याला धोका नाही, असंच अनेकांना वाटतं. त्यामुळे काही लोक अशा प्राण्यांच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका मगरीच्या (Crocodile) अगदी जवळ जाऊन तिला पाण्यात पुन्हा ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेसोबत जे घडलं ते पाहून अंगावर काटाच येईल (Crocodile attack). मगरीने महिलेवर केलेल्या भयंकर हल्ल्याचा (Crocodile attack on woman). व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.  सिडनी ग्लेन नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उटाहच्या एका रेप्टाइल झूमधील ही घटना आहे. या फेसबुक पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलेवर मगरीने हल्ला केला आहे, ती याच प्राणीसंग्रहायातील हँडलर आहे. तर महिलेला मगरीच्या तावडीतून सोडणारी व्यक्ती प्राणीसंग्रहायात फिरण्यासाठी आली होती. हे वाचा - OMG! कुत्र्यासाठी थेट भुकेल्या अ‍ॅनाकोंडाशी भिडला तरुण; थरारक VIDEO VIRAL मगर एका काचेमध्ये बंदिस्त आहे. पण काचेचा दरवाजा एका बाजूने उघडा होताच ती पाण्यातून बाहेर डोकावते आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिथं असलेली हँडलर तिच्या जवळ जाते. अगदी तिच्या तोंडाजवळ आपला हात नेते, किंबहुना ती मगरीच्या तोंडातच हात टाकते. प्राणीसंग्रहायात असली म्हणून काय झालं, शेवटी ती मगरच. स्वभावानुसार तिने त्या महिलेचा हात आपल्या जबड्यात धरला आणि तिला पाण्यात खेचलं. महिलेने मगरीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण मगरीने तिला अधिकच घट्ट जखडून ठेवलं. महिला पाण्याच्या खाली आणि मगर तिच्यावर. हे वाचा - VIDEO - आकाशातून आलेल्या मृत्यूलाही दिला चकवा; हुश्शार सशाने एका उडीत वाचवला जीव इतक्यात त्या महिलेला मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी एका डेअरिंगबाज माणसाने पाण्यात उडी मारली. आपल्या जीवाची पर्वा न करता तो त्या मगरीशी भिडला. मगरीच्या पाठीवर बसला आणि तिच्या जबड्यातून महिलेचा हात खेचून काढण्याचा प्रयत्न केला. कसंबसं करून मगरीच्या तावडीतून त्याने महिलेची सुटका केली. महिला तिथून बाहेर पडली. त्यानंतर ती व्यक्तीसुद्धा बाहेर पडली.
    Published by:Priya Lad
    First published: