बर्लिन, 02 डिसेंबर : राजकारणातील काही लव्ह स्टोरी तुम्हाला माहिती असतील. अशाच एका राजकीय नेत्याच्या प्रेम प्रकरणाने त्या नेत्याच्या खासगी आयुष्यासह राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. एक खासदार एका अडल्ट स्टारच्या प्रेमात पडला आहे. तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की त्याने धक्कादायक पाऊल उचललं आहे. अडल्ट स्टारसाठी त्याने आपल्या बायको आणि तीन मुलांसह जे केलं त्याबाबत संताप व्यक्त केला जातो आहे.
जर्मनीतील हा खासदार प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. हेगन रेनहोल्ड असं या खासदाराचं नाव. 44 वर्षांचे हेगन फ्री डेमोक्रेटिक पार्टीचे खासदार आहेत. 2017 सालापासून त्यांच्याकडे खासदारकी आहे. ते विवाहित आहेत. त्यांची 51 वर्षांची पत्नी कॅरोलिन प्रीस्लर, त्यासुद्धा एफडीपीच्या खासदार आहेत. रेनहोल्ड आणि प्रीस्लर दोघांच्या लग्नाला 16 वर्षे झालीत. त्यांना तीन मुलंही आहेत. पण आता त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यात असं काही खळबळजनक घडलं आहे ज्यामुळे राजकारणातही धक्का बसला आहे.
रेनहोल्ड एका अडल्ट स्टारच्या प्रेमात पडले आहेत आणि आता ते तिच्यासोबतच आपलं नवं आयुष्य सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ही अडल्ड स्टार त्यांची एक्स-गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जातं आहे.
हे वाचा - तुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला
डेली स्टारच्या वृत्तानुसार त्यांच्या या गर्लफ्रेंडचं नाव एनीना सेमेलहाक आहे. उकाटिस नावाने ती अश्लील फिल्ममध्ये काम करते. उकाटिसने याआधी कोट्यधीश रिअल इस्टेटसह लग्न केलं होतं. आता तिची स्वतःच्या मालकीची रिअल इस्टेट एजन्सी आहे. 43 वर्षांची उकाटिस राजकीय क्षेत्रात येणार असल्याची चर्चा आहे. पुढील स्थानिक निवडणुकांत एफडीपीमार्फत उभी राहण्याची शक्यता आहे. रेनहोल्ड यांच्यासह तिने मेंटरशिप सेशनमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्या नव्या प्रेमाला तिने एक महान प्रेम म्हटलं आहे. रेनहोल्डसोबत आपण एका सुखद भविष्यात जात असल्याचं ती म्हणाली.
आपल्या नवऱ्याच्या या प्रेमप्रकरणाबाबत समजल्यानंतर प्रीस्लरने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने ट्वीट केलं आहे. ती म्हणाले गेले काही महिने माझ्यासाठी खूप कटू राहिले. मेक्लेनबर्ग-वेस्टर्न पोमेरानियामध्ये हेगन रेनहोल्ड आणि राजकारण यांच्या साथीनंतर आता काही नवं करायचं आहे. आपण बर्लिनला परत जात आहोत आणि मेक्लेनबर्ग-वोरपोमेर्नमधील खासदारकीच्या रूपातील आपली नोकरीही सोडत आहोत.
हे वाचा - उंदरांचा इतका उच्छाद की सरकारही वैतागलं; बंदोबस्त करणाऱ्याला एक कोटी रुपयांची ऑफर
रेनहोल्ड यांनी अडल्ट स्टारसाठी आपली पत्नी आणि तीनही मुलांनाही सोडायला तयार झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नीने राजकारण सोडण्याचं ठरवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Germany, Mp, Political leaders, Political party, Viral, Viral news, World news