Home /News /crime /

फेसबुकवरील प्रियकरासाठी महिलेनं घेतला बाळाचा जीव; फेक अकाउंटमुळे 3 आयुष्य उद्धवस्त

फेसबुकवरील प्रियकरासाठी महिलेनं घेतला बाळाचा जीव; फेक अकाउंटमुळे 3 आयुष्य उद्धवस्त

Facebook feature

Facebook feature

पोलिसांना (Police) या घटनेचा खुलासा कऱण्यात शनिवारी तेव्हा यश आलं, जेव्हा या महिलेचा तथाकथित फेसबुक लव्हर इतर कोणीही नसून तिच्याच नात्यातील दोन महिला हे फेक अकाऊंट (Fake Facebook Account) चालवत असल्याचं समोर आलं.

    तिरुअनंतपुरम 04 जुलै : एक हैराण करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. यात एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुकवरील प्रियकरासोबत (Facebook Lover) पळून गेली. यानंतर ही संपूर्ण घटना प्रँक (Prank) असल्याचं समोर आलं. मात्र, या घटनेत तिच्या दोन नातेवाईकांचा आणि बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांना (Police) या घटनेचा खुलासा कऱण्यात शनिवारी तेव्हा यश आलं, जेव्हा या महिलेचा तथाकथित फेसबुक लव्हर इतर कोणीही नसून तिच्याच नात्यातील दोन महिला हे फेक अकाऊंट (Fake Facebook Account) चालवत असल्याचं समोर आलं. ही घटना केरळच्या (Kerala) कोलम जिल्ह्यातील आहे. या घटनेत नात्यातीलच दोन महिला प्रेमी बनून रेश्मासोबत बोलत असत. मात्र, पोलिसांकडून पकडलं जाण्याच्या आणि प्रँक चुकीच्या मार्गावर गेल्याच्या भीतीनं आत्महत्या केली. चोवीस वर्षीय रेश्माला पोलिसांनी तिच्याच नवजात बाळाची हत्या केल्याच्या आरोपीत अटक केली होती. तिच्यावर आपल्याच बाळाला कोल्लम जिल्ह्यातील कल्‍लूवथुक्‍कल गावात एका शेतात सोडून गेल्याचा आणि त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या बाळाचा मृत्यू रुग्णालयात झाला होता. लॉकडाऊन आणि कर्जामुळे तरुण हवालदिल; रात्री लेकरांना शीतपेय आणून दिलं अन्... पोलिसांनी बाळाच्या आईची ओळख पटवण्यासाठी परिसरातील अनेक महिलांचे डीएनए घेतले. यानंतर 22 जून रोजी रेश्माला अटक कऱण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं, की चोवीस वर्षीय रेश्माचा पती चार महिन्यांआधी कामासाठी बाहेरच्या देशात गेला होता. याच काळात रेश्माची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत मैत्री झाली. या काळात ती गर्भवती होती. तिची मैत्री पुढे प्रेमात बदलली. मात्र, तिनं घरात कोणालाही आपण गर्भवती असल्याचं सांगितलं नाही. पोलीस तपासात समोर आलं, की रेश्मा आपली बहीण आर्याचं सिम कार्ड वापरत होती. आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ पोलिसांनी असा संशय होता, की या सिमकार्डचा वापर फेसबुक फ्रेंडसोबत संपर्क ठेवण्यासाठी केला गेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आर्यालाही नोटीस पाठवली. मात्र, यानंतर दुसऱ्याच दिवशी आर्या आणि रेश्माच्या वहिनीची मुलगी ग्रीष्मा या दोघीही बेपत्ता झाल्या. या दोघींचाही मृतदेह घराजवळच असलेल्या एका नदीच्या काठावर आढळला. या दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. एसीपीनं सांगितलं, की ग्रीष्माच्या प्रियकराकडून आम्हाला ही गोष्ट समजली. ग्रीष्मानं सांगितलं की तिचा प्रियकर रेश्मासोबत प्रँक करत होता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर आर्यानं आपल्या सासूला ही संपूर्ण घटना सांगितली. मात्र, सासू कामासाठी बाहेर जाताच आर्यानं ग्रीष्मासोबत नदीत उडी घेतली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Facebook

    पुढील बातम्या