मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोर बाजारातून त्याने घेतला 90 पैशांचा तुटका चमचा, लाखोंची बोली लागल्याने बदललं नशीब!

चोर बाजारातून त्याने घेतला 90 पैशांचा तुटका चमचा, लाखोंची बोली लागल्याने बदललं नशीब!

व्यक्तीनं लंडनमधल्या (London) रस्त्यावर भरणाऱ्या बाजारातून म्हणजेच कार बूट सेलमधून (Car Boot Sale) एक जुना चमचा (Old Spoon) खरेदी केला. हा चमचा फारच जुना आणि वाकलेला होता. हा चमचा जरा वेगळाच आहे, असं त्या व्यक्तीला पाहता क्षणी वाटलं.

पुढे वाचा ...

लंडन, 31 जुलै : कोणाचं नशीब (Luck) कधी बदलेल हे सांगता येत नाही. नशीब मेहरबान असेल तर तुम्ही अगदी राखेतूनही भरारी घेऊ शक; मात्र यासाठी काही वेळा आपली नजर चौकस असणं गरजेचं असतं. लंडनमधल्या एका व्यक्तीचं नशीब अशाच काहीशा पद्धतीने पालटलं. या व्यक्तीनं लंडनमधल्या (London) रस्त्यावर भरणाऱ्या बाजारातून म्हणजेच कार बूट सेलमधून (Car Boot Sale) एक जुना चमचा (Old Spoon) खरेदी केला. हा चमचा फारच जुना आणि वाकलेला होता. हा चमचा जरा वेगळाच आहे, असं त्या व्यक्तीला पाहता क्षणी वाटलं. केवळ 90 पैशांत त्या व्यक्तीने हा चमचा खरेदी केला. परंतु, हा चमचा जेव्हा त्या व्यक्तीनं ऑनलाइन विक्रीसाठी (Online sale) ठेवला, तेव्हा तो खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर येऊ लागल्या. या प्रकारामुळे ही व्यक्ती आश्चर्यचकित झाली.

खरं तर हा चमचा खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं आपली ओळखल लपवली असली, तरी चमच्याचा लिलाव करणाऱ्या कंपनीने ही गोष्ट शेअर केली आहे. ही व्यक्ती कार बूट मार्केटमध्ये कायम जात असे. एके दिवशी या मार्केटमधल्या एका विक्रेत्याकडे या व्यक्तीने हा चमचा पाहिला आणि केवळ 90 पैशांत तो खरेदी केला. चमचा खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीने समरसेटमधील (Somerset) सिल्व्हर एक्सपर्ट Lawrences Auctioneers शी संपर्क साधला. हा चमचा खूप किमती असल्याचं त्यांनी या व्यक्तीला सांगितलं. हा चमचा 13व्या शतकातील असून, त्याची किमत लाखांत असल्याचं ऑक्शन हाउसचे (Auction House) अॅलेक्स बुचर यांनी सांगितलं.

हळूहळू वाढली किंमत

सुरुवातीला या चमच्याची किंमत सुमारे 52 हजार रुपये ठेवण्यात आली. त्यानंतर चमच्याचा लिलाव सुरू होताच हळूहळू बोली वाढत गेली. अखेरीस या चमच्यासाठी अंतिम बोली 1 लाख 97 हजार रुपये लागली. कर (Tax) आणि अतिरिक्त चार्जेस (Extra Charges) मिळून ही रक्कम 2 लाखांवर गेली. ही रक्कम खरेदी रकमेच्या तुलनेत 12 हजार पट अधिक होती. एक साधा तुटलेला चमचा एवढा किमती कसा ठरला या विचाराने लोक आश्चर्यचकित झाले.

हा जुना चमचा चांदीचा होता

या चमच्याची लांबी 5 इंच होती. या चमच्याचं डिझाइन रोमन युरोपियन शैलीचं (Roman European Style) आहे. हा चमचा खूप वर्षं पाणी किंवा जमिनीखाली दबलेला असावा असं वाटत होतं. जेव्हा त्या व्यक्तीने हा चमचा खरेदी केला तेव्हाच त्याला हा चमचा चांदीचा असावा, अशी शंका आली होती. त्यामुळे तो त्याने खरेदी केला आणि तातडीने ऑक्शन हाउसशी संपर्क साधला. ज्या वेळी या व्यक्तीला या चमच्याचं महत्त्व आम्ही सांगितलं तेव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही, असं अॅलेक्स यांनी सांगितलं. आता या चमच्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Auction, London