जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: एक विवाह ऐसा भी! या जोडप्याचं लग्न पाहण्यासाठी झालं 'ट्रॅफिक जॅम'

VIDEO: एक विवाह ऐसा भी! या जोडप्याचं लग्न पाहण्यासाठी झालं 'ट्रॅफिक जॅम'

VIDEO: एक विवाह ऐसा भी! या जोडप्याचं लग्न पाहण्यासाठी झालं 'ट्रॅफिक जॅम'

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) व्हायरल होत आहे. हे दोघंही रस्त्यावरच एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 जुलै : आजकाल सोशल मीडिया (Social Media) आणि टेक्नोलॉजी यामुळे नवरदेव आणि नवरी लग्नाच्या आधीच खूप चांगले मित्र होतात. त्यांचं हे खास बॉन्डिंग लग्नातही दिसून येतं. लग्नसमारंभादरम्यान नवरदेव आणि नवरी अनेकदा एकमेकांसोबत मस्ती करतानाही दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ वरमाळा (Varmala Video) घालताना शूट केला गेला आहे. मंडपातच गाढ झोपली नवरी; नवरदेव सोडून तिसऱ्यानंच घेतला फायदा, KISS करतानाचा Video सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) व्हायरल होत आहे. हे दोघंही रस्त्यावरच एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. आणखी एक मजेशीर बाब म्हणजे हे दोघंही आपल्या खुर्च्यांवर बसलेले आहेत, मात्र या खुर्च्या जमिनीवर नाही. तर, नातेवाईकांनी आणि मित्रांनी या खुर्च्या वरती उचलून घेतल्या आहेत, जेणेकरून नवरी आणि नवरदेव सहजरित्या एकमेकांना वरमाळा घालू शकणार नाहीत.

जाहिरात

VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून चक्रावून जाल निरंजन महापात्रानं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरीदेव हसत आणि मस्ती करत एकमेकांना वरमाळा घालत असल्याचं दिसतं. त्यांची ही मस्ती पाहून तिथे उपस्थित लोकंही हसू लागतात. आसपासच्या घरांमधील लोकही बालकनीमधून वरमाळेचा हा कार्यक्रम पाहताना दिसतात. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 7 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात