मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्विमिंग पूलखाली NASA ने वसवलं दुसरं जग, पाण्याच्या आत घर, रस्ते आणि गाड्या, INSIDE PHOTO

स्विमिंग पूलखाली NASA ने वसवलं दुसरं जग, पाण्याच्या आत घर, रस्ते आणि गाड्या, INSIDE PHOTO

तुम्ही कधी पाण्याखालचं शहर (Underwater City) पाहिलं आहे का? कारण सध्या पाण्याखालचं हे जग फारच चर्चेत आहे. कोरोनामुळे अनेक देशांच्या पर्यटन (Tourism) व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, त्यात दुबईचाही (Dubai) समावेश आहे.

मुंबई, 6 ऑगस्ट : तुम्ही कधी पाण्याखालचं शहर (Underwater City) पाहिलं आहे का? कारण सध्या पाण्याखालचं हे जग फारच चर्चेत आहे. कोरोनामुळे अनेक देशांच्या पर्यटन (Tourism) व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यात दुबईचाही समावेश आहे. आता हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये नुकतेच दुबईचे डीप डाईव्ह (Deep Dive) लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. या डीप डाईव्हला जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल म्हणून ओळखलं जातं. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला एक संपूर्ण शहर पाण्याखाली दिसतं. यामध्ये प्रवेश करून लोकांना जणू काही एका वेगळ्या जगामध्ये प्रवेश केल्याचा अनुभव मिळत आहे.

पाण्याखाली असणाऱ्या या जलमग्न शहरामध्ये अपार्टमेंट, कार आणि बाईक आहेत. हे सुमारे 60 मीटर खोल आहे. जगभरात डायव्हिंगसाठी (Diving) बनवलेल्या स्विमिंग पूलपैकी (Swimming Pool) हा डीप डाईव्ह पूल सर्वांत खोल आहे, त्यामुळे त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. टिकटॉकवरील (TikTok) @dabdulla_alsenaani नावाच्या युजरने या पाण्याखालील जगाची झलक सर्वांसोबत शेअर केली आहे. या ठिकाणी असणाऱ्या स्विमिंग पुलच्या टाईल्सच्या पलीकडे दुसरे जग वसलेलं पाहायला मिळतं. जेव्हा लोकं खूप आतमध्ये गेले तेव्हा त्याठिकाणी असणारं वेगळं जण पाहून सर्वजण आवक् झाले. त्यांना आतमध्ये अपार्टमेंट, (Apartment) रस्ते (Roads) आणि वाहने (Vehicles) सुद्धा दिसली.

underwater city in deepest swimming pool

इमारतींना खिडक्या सुद्धा होत्या

पाण्याखाली असलेल्या अपार्टमेंटला खिडक्या (Windows) आहेत. खिडक्यांना काचा देखील बसवलेल्या आहेत. तसंच त्या ठिकाणी बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. पूलमध्ये बाइक राइडचा (Bike Ride) आनंद घेता येतो. एवढेच नाही तर आतमध्ये एक बाथरूम (Bathroom) देखील आहे. त्या ठिकाणी लोक टॉयलेट सीटवर बसून फोटो काढतात. हे बाथरूम खास करून व्हिजिटर्ससाठी (Visitors) बनवलं आहे. लोकं या पाण्याखालील वेगळ्या आणि अद्भुत अशा जगाचा आनंद लुटत आहेत.

underwater city in deepest swimming pool

नासाने तयार केलं आहे हे वेगळं जग

दुबईमधील हे डीप डाईव्ह या वर्षी जूनमध्ये सुरू करण्यात आलं आहे. या प्रोजेक्टमध्ये 14 दशलक्ष लिटर पाण्याचा वापर करण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार यामध्ये वापरलेले तंत्रज्ञान नासाचे (NASA) आहे. त्यांनी यामध्ये पाण्याच्या फिल्ट्ररेशनची (Filtration) सुद्धा विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये दर 6 तासांनी पाणी फिल्टर केले जाते. त्यामुळे नवीन येणाऱ्या लोकांना शुद्ध पाणी मिळते. स्कुबा डायव्हिंगची (Scuba Diving) आवड असणारे लोक याचा खूप आनंद घेत आहेत. दुबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रोजेक्ट (Project) अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. आपणही सध्या कुठं फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि स्कुबा डायव्हिंगची आवड असेल तर या स्थळाचा नक्कीच विचार करू शकता.

First published: