नवी दिल्ली 16 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर असे असतात जे वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ पाहून आपण हैराण होतो. मात्र काही घटना अगदी पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) शेअर केला गेला आहे. यात एका महिलेसोबत असं काही घडलं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. बाईक चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि… तुम्ही एन्जॉय करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या उत्साहानं गेला आणि असं काही घडलं की तुमच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं तर? निश्चितच कोणालाही या गोष्टीचं फार वाईट वाटेल आणि मूडही खराब होईल. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील महिलेसोबतही असंच काहीसं घडलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला पोहण्यासाठी (Swimming) पाण्यास उतरण्याची तयारी करत आहे. मात्र, अचानक तिचा तोल जातो आणि ती जोरानं उलटी होऊन पाण्यात कोसळते.
देवाच्या परीक्षेसाठी लेकीचा जीव घातला धोक्यात; आईने 193 किमी स्पीडने पळवली कार हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या महिलेसोबत जे काही घडलं ते पाहून तिथे उपस्थित लोकही हसू लागले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ urban._jatts नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 60 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यूजर्स यावर अनेक मजेशीर कमेंटही करत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.