नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Viral Video of Rooster) झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भलतीच पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये कोंबडा एका मुलाच्या मागे पळून त्याला धडा शिकवताना दिसतो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. जबरदस्त जुगाड! सायकललाच बनवलं बुलेट; VIDEO पाहून मोठमोठे इंजिनिअरही होतील अवाक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा मैदानात अतिशय वेगाने धावत आहे. हे पाहून असं वाटतं की त्याच्या मागे एखादं कुत्रं लागलं आहे. मात्र पुढच्याच क्षणी तुम्हाला एक कोंबडा त्याच्या मागे धावत असल्याचं दिसेल. कोंबड्याचं स्पीड पाहून हा मुलगा घाबरतो आणि ओरडत पळू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडा आपल्या चोचीने या मुलाला चावण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान तिथे उपस्थित एका व्यक्तीनं हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे.
व्हिडिओमध्ये कोंबडा ज्या पद्धतीनं या मुलाच्या मागे लागला आहे ते पाहून कोणीही घाबरेल. हा कोंबडा या मुलाच्या मागे का लागला होता, हे समजू शकलेलं नाहीय मात्र या मुलाची अवस्था पाहून अनेकांना त्याची दया आली आहे तर अनेकांना हसू आलं आहे. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरनं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, आणखी एका रागावलेला कोंबडा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धोकादायक रस्ता आणि शेजारीच खोल दरी; इतक्यात घसरली दुचाकी अन्…, Shocking Video लोक हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत. आतापर्यंत सहा हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, मला तर या मुलाची दया येत आहे. कोंबडा बिचाऱ्याला किती पळवत आहे. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की या मुलाच्या जागी मी असतो तर मला रडायलाच आलं असतं.