मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीसमोरच मुलानं केलं असं काही की भडकला नवरदेव; स्टेजवरच लगावली कानशिलात, VIDEO

नवरीसमोरच मुलानं केलं असं काही की भडकला नवरदेव; स्टेजवरच लगावली कानशिलात, VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात त्यांच्या नात्यातील कोणीतरी स्टेजवर येतं आणि आपल्या खिशातील पैशाच्या नोटा काढतं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : लग्नात अनेकदा आपण पाहिलं असेल की जेव्हा वरातीत लोक डान्स करण्यात मग्न असतात तेव्हा काही लहान मुलं पैसे उडवण्यात दंग असतात. पैसे उडवताना ते मागे-पुढे कोणाकडेच बघत नाहीत. अनेकदा लोकांच्या ही बाब लक्षात येताच ते या लहान मुलांना असं करण्यापासून आडवतात. मात्र लग्नाच्या स्टेजवरच मुलांनी पैसे उडवायला सुरुवात केली तर हे नक्कीच अजब वाटणारं आहे. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होत आहे. मात्र मुलाचं हे कृत्य पाहून नवरदेवानं (Angry Groom) स्टेजवरच त्याच्या कानशिलात लगावली.

..अन् अंगावर पडली उकळलेली चिकन करी; किचनमधील भयंकर घटनेचा LIVE VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात त्यांच्या नात्यातील कोणीतरी स्टेजवर येतं आणि आपल्या खिशातील पैशाच्या नोटा काढून हवेत उडवू लागतं. नातेवाईकानं अतिशय स्वॅगमध्ये चष्मा लावलेला असतो आणि आपल्या हाताने एक-एक नोट तो नवरी आणि नवरदेवावर टाकत असतो.

इतक्यात स्टेजवर काही लहान मुलं येतात. यातील एक मुलगा पैसे उधळण्यासाठी नवरदेवाच्याच मांडीवर पडलेल्या नोटा उचलतो. हे पाहून नवरदेव रागवतो आणि या मुलाकडे पाहू लागतो.

जबरदस्त जुगाड! सायकललाच बनवलं बुलेट; VIDEO पाहून मोठमोठे इंजिनिअरही होतील अवाक

या मुलालाही समजतं की नवरदेव रागात आहे. मात्र तरीही तो शांत बसत नाही. हवेत नोटा पाहून हा मुलगा पुन्हा नोटा उडवू लागतो आणि नवरदेवाच्या जवळ पडलेल्या नोटा उचलू लागतो. इतक्यात रागात नवरदेव या मुलाच्या कानशिलात लगावतो. नवरदेवानं जोरदार चापट मारताच हा मुलगा स्टेजवरून पळून जातो. नवरदेव हा लहान मुलगा हवेत नोटा उडवत असल्यानं रागात असतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर balle_jatta_balle नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

First published:

Tags: Funny video, Wedding video