मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: कपड्यावरुन लग्नातच भिडले दोन पक्ष; अक्षरशः धाडकन नवरीच्या अंगावर कोसळले अन्...

VIDEO: कपड्यावरुन लग्नातच भिडले दोन पक्ष; अक्षरशः धाडकन नवरीच्या अंगावर कोसळले अन्...

या अजब खेळाच्या (Weird Game in Wedding) नादात दोन्ही बाजूच्या लोकांचं इतर कुठेही लक्ष जात नाही. यातच एका व्यक्तीचा तोल जातो आणि तो नवरीच्या अंगावर पडतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 ऑगस्ट : प्रत्येक लग्नात काही असे अजब किस्से नक्की होतात, जे अनेक वर्ष लक्षात राहतात. आजकाल तर सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ (Wedding Videos) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. नुकताच अशाच एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा मजेशीर व्हिडिओ (Funny Wedding Video) पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

67 वर्षीय वृद्धाचा 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह; गावकऱ्यांचा खळबळजनक आरोप

प्रत्येक लग्नात निरनिराळे लोक येतात. याच पाहुण्यांमुळे लग्नातील उत्साह आणखीच वाढतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव लग्नातील इतर कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर एका मंदिराच्या बाहेर जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या आसपास नातेवाईक आणि कुटुंबीय बसलेले आहेत. इतक्यात काही लोक दोन गटात विभागून एका कपड्यासाठी एकमेकांसोबत भिडल्याचे पाहायला मिळतात.

VIDEO: लग्नाच्या आधीच मित्रांनी नवरदेवाची केली अशी अवस्था की ओळखणंही झालं कठीण

या अजब खेळाच्या (Weird Game in Wedding) नादात दोन्ही बाजूच्या लोकांचं इतर कुठेही लक्ष जात नाही. यातच एका व्यक्तीचा तोल जातो आणि तो नवरीच्या अंगावर पडतो. नवरी आणि नवरदेवाजवळ बसलेला एक व्यक्ती त्या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःही कोसळतो. यानंतर नवरी आणि नवरदेवासोबतच तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकतो. हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 11 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा अजब खेळ आणि नवरीची अवस्था पाहून नेटकरीही पोट धरून हसत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Video Viral On Social Media, Wedding video