मराठी बातम्या /बातम्या /Viral /

67 वर्षीय वृद्धाचा 19 वर्षाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह; गावातील लोकांनी केले खळबळजनक आरोप

67 वर्षीय वृद्धाचा 19 वर्षाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह; गावातील लोकांनी केले खळबळजनक आरोप

67 वर्षीय व्यक्तीनं 19 वर्षाच्या तरुणीसोबत केलेला प्रेमविवाह सध्या चर्चेत आहे. या लग्नानंतर गावातील लोकांनी बैठक बोलावली आणि जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे

67 वर्षीय व्यक्तीनं 19 वर्षाच्या तरुणीसोबत केलेला प्रेमविवाह सध्या चर्चेत आहे. या लग्नानंतर गावातील लोकांनी बैठक बोलावली आणि जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे

67 वर्षीय व्यक्तीनं 19 वर्षाच्या तरुणीसोबत केलेला प्रेमविवाह सध्या चर्चेत आहे. या लग्नानंतर गावातील लोकांनी बैठक बोलावली आणि जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे

  • Published by:  Kiran Pharate

चंदीगड 08 ऑगस्ट : एका 67 वर्षीय व्यक्तीनं तरुणीसोबत प्रेमविवाह (Love Marriage) केला आहे. यानंतर गावातील लोकांनी बैठक घेत नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना हरियाणाच्या (Haryana) बीबीपूर गावातील आहे. ग्रामस्थांनी थेट पोलीस (Police) ठाण्यात धाव घेत या लग्नाचं सत्य तपासून तरुणीला तिच्या माहेरच्या लोकांकडे सोपवलं जावं, अशी मागणी केली आहे. या लग्नाची चर्चा दूरपर्यंत रंगली असून यामुळे गावाची बदनामी होत असल्याचं सांगत मुलीला माहेरी न पाठवल्यास काहीही करू, असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे. सोबतच शरीयत एखाद्या विवाहित (Married Woman) महिलेला तलाक न घेता दुसऱ्यासोबत लग्न करण्यास परवानगी देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. या घटनेतील तरुणी मेवात जिल्ह्यातील बीबीपूर गावातील आहे तर तिचा पती पलवल जिल्ह्यातील हुंचपुरी गावतील.

मेवात भागात एका 67 वर्षीय व्यक्तीनं 19 वर्षाच्या तरुणीसोबत केलेला प्रेमविवाह सध्या चर्चेत आहे. या लग्नानंतर बीबीपूर गावातील लोकांनी बैठक बोलावली आणि जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. गावातील लोकांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं, की या वृद्ध व्यक्तीच्या प्रेमविवाहाप्रकरणी उच्च न्यायालयानं (High Court) चांगला निर्णय सुनवत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. यासोबतच गावकऱ्यांनी सांगितलं, की या गावात हिंदू आणि मुस्लीम लोक अतिशय प्रेमानं राहतात आणि एकमेकांचा आदर करतात. आजपर्यंत आम्ही अशी घटना ऐकली किंवा पाहिलीही नाही

अचानक विमानात झाली भल्यामोठ्या सापाची एन्ट्री अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO

गावकऱ्यांनी सांगितलं, की 19 वर्षीय तरुणी विवाहित असूनही तिनं शरीयतचे नियम तोडले आहेत. उपस्थित लोकांनी सांगितलं, की 67 वर्षाच्या वृद्धाला मुलं आणि संपूर्ण कुटुंबही आहे. अशात हे पाऊल उचलताना विचार करणं गरजेचं होतं. इतकंच नाही तर गावातील लोकांनी या वृद्धाची थेट आसारामसोबत तुलनाही केली. दोघांमध्ये काहीही फरक नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं. सोबतच या वृद्धालाही शिक्षा व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या वृद्धानं 19 वर्षीय तरुणीसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. मात्र, मुलीवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा Game over; मित्राने सर्वांसमोरच दिलं असं Wedding gift

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 67 वर्षांचा हा व्यक्ती बऱ्याच काळापासून ताबिज देण्याचं काम करतो आणि ज्या 19 वर्षाच्या तरुणीसोबत त्यानं विवाह केला आहे, त्या तरुणीची आई आधीपासूनच या ढोंगी बाबाकडे जात होती. अशात आपल्या जाळ्यात अडकवत वृद्धानं बळजबरीनं तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

First published:

Tags: Love story, Viral news