जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हुबेहूब आईसारखी अ‍ॅक्टिंग करत चिमुकलीनं वेधलं लक्ष; VIDEO मधील संभाषण ऐकून पोट धरून हसाल

हुबेहूब आईसारखी अ‍ॅक्टिंग करत चिमुकलीनं वेधलं लक्ष; VIDEO मधील संभाषण ऐकून पोट धरून हसाल

हुबेहूब आईसारखी अ‍ॅक्टिंग करत चिमुकलीनं वेधलं लक्ष; VIDEO मधील संभाषण ऐकून पोट धरून हसाल

एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. ही मुलगी इतक्या लहान वयात ज्या पद्धतीनं आपल्या आईची अॅक्टिंग करत आहे, ती पाहण्यासारखी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) मजेशीर व्हिडिओ (Funny Videos) उपलब्ध आहेत. असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही की लहान मुलांच्या व्हिडिओ नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. लहान मुलांचे काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात, की ते पाहून हसू आवरणंही कठीण होतं. तर, काही लहानग्यांचं टॅलेंट पाहून सगळेच अवाक होतात. इंटरनेटवर लहान मुलांच्या सिंगिंग आणि डान्सिंगचे (Dancing Videos of Kid) अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र, काही व्हिडिओ असेही असतात, जे तुम्हाला हैराण करतील. सध्या एका लहान मुलीच्या अॅक्टिंगचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Acting Video Viral) होत आहे. पोझ देता देता घसरला पाय; Eiffel Tower जवळ धाडकन कोसळली महिला; VIDEO VIRAL लहान मुलांच्या कौशल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी एकदा सोशल मीडियावरील लहान मुलांचे व्हिडिओ नक्की पाहावे. आजकाल ही लहान मुलं प्रत्येक गोष्टीत आपलं वेगळेपण दाखवून सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलगी इतक्या लहान वयात ज्या पद्धतीनं आपल्या आईची अॅक्टिंग करत आहे, ती पाहण्यासारखी आहे. कियारा नौटियाल नावाची ही चिमुकली अनेकदा आई आणि मुलीच्या संभाषणाचे व्हिडिओ बनवते. तिचा लेटेस्ट व्हिडिओदेखील असाच आहे. यात किट्टू आणि तिची आई जास्त गोड खाण्याच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत.

जाहिरात

नवरदेव ठोंब्यासारखा बसून राहिला, अखेर पंडितनेच…; लग्नाचा VIDEO पाहून व्हाल शॉक हा व्हिडिओ लहानग्या kiara_minime नं आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला आहे. या चिमुकलीचे हावभाव आणि अंदाज पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर कियाराच्या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळते. इन्स्टाग्रामवर तिचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. लोक केवळ तिचे व्हिडिओ शेअर करत नाहीत तर यावर निरनिराळ्या कमेंटही करतात. कियाराची अॅक्टिंग आणि एक्सप्रेशन दोन्ही लोकांचं मन जिंकून घेतात. तिच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात