पॅरिस, 11 ऑगस्ट : एखाद्या टुरिस्ट स्पॉटवर (Tourist Spot) फिरताना त्या ठिकाणच्या आठवणी जपण्यासाठी आपण व्हिडीओ शूट करतो किंवा फोटो काढतो. पण अनेकदा आपलं फोटो किंवा व्हिडीओ शूट फसतं. म्हणजे आपण करायला एक जातो आणि घडतं भलतंच. असंच एका महिलेसोबत झालं आहे, जी आयफेल टॉवरजवळ (Eiffel Tower) आपला व्हिडीओ शूट करत होती.
फ्रान्समधील (France) पॅरिस (Paris) येथील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ एक महिला घसरून पडली. या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला असून, तो जोरदार व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहणं हे अनेक प्रेमी युगुलांचं स्वप्न असतं. नुकतीच एक महिला सलवार सूट परिधान करून आयफेल टॉवर परिसरात भ्रमंतीसाठी गेली होती. एखाद्या सर्वसामान्य टुरिस्ट प्रमाणे ही महिला आयफेल टॉवरसमोर पोज देऊन व्हिडीओ शूट करत उतारावरून खाली उतरत होती. खाली उतरत असताना अचानक तिचा पाय घसरून ती खाली पडली आणि घसरत गेली.
हे वाचा - नवरीचे दागिने गायब, मेकअपही बिघडला; लग्नादिवशीच नवऱ्याने मग...; पाहा VIDEO
सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा घसरून पडतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल (Viral) होत असून, हा व्हिडीओ पाहिल्यावर सुरुवातीला तुम्ही थोडं हसाल पण पुढच्याच क्षणाला तुमच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही. महिलेला असं घसरताना पाहून अनेक नेटिझन्सला हसू आवरलं नाही तर काही नेटिझन्सनी या महिलेला फार दुखापत झाली नाही ना, त्यांना मोठी जखम झाली नाही ना अशी प्रकारची चिंता कमेंटमधून (Comment) व्यक्त केली आहे.
हे वाचा - मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येत होता फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम
त्यामुळे टुरिस्ट स्पॉट असो किंवा कोणतंही ठिकाण तिथं शूट करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक असतं. त्यातही जर टुरिस्ट स्पॉटवर जर पायऱ्या किंवा स्लाईडस असतील तर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. हेच या व्हिडीओतून दिसून येतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos