मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरदेव ठोंब्यासारखा फक्त बसून राहिला, अखेर पंडितनेच...; लग्नाचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक

नवरदेव ठोंब्यासारखा फक्त बसून राहिला, अखेर पंडितनेच...; लग्नाचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक

लग्नात पंडितला असं काही करताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

लग्नात पंडितला असं काही करताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

लग्नात पंडितला असं काही करताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 11 ऑगस्ट : लग्नात पंडित मंत्र म्हणता म्हणता नवरा-नवरीला (Bride Groom Video) लग्नाच्या (Wedding video) विधी करायला सांगतात. ज्यामध्ये पंडित जसं सांगतात तसं नवरा-नवरीला करायचं असतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात पंडितने विधी करायला सांगता सांगता स्वतःच उरकला की काय? असंच दिसून येतं आहे.

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण शॉक झाला आहे. लग्न नक्की कुणाचं होतं आहे, तेच समजत नाही आहे. व्हिडीओत दिसतं एक आहे. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच काहीतरी घडतं आहे.

व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी बसले आहेत. नवरी झोपल्यासारखीच दिसते आहे. तर नवरदेव फक्त समोर आणि समोरच बघतो आहे. नवरीचा सिंदूर भरण्याचा विधी सुरू आहे. आता हा विधी असा आहे, जो नवरदेवानेच करायला हवा. पण इथं तर चक्क पंडितच विधी उरकताना दिसत आहेत. पंडित नवरीच्या भांगेत कुंकू भरताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहू सर्वजण शॉक झाले आहेत.

हे वाचा - असा नाचला असा नाचला; अखेर ढोलवाल्याने ढोल सोडून त्यालाच बडवलं; पाहा Funny dance

व्हिडीओ नीट पाहिला तर दिसेल की पंडितने नवरदेवाचा हात धरला आहे. नवरीच्या मागच्या बाजूने नवऱ्याचा हात आहे. पंडितने आपल्या हातात नवऱ्याचा हात धरून नवरीच्या भांगेत कुंकू भरलं आहे. पण पाहताच असं वाटतं की जणू पंडितच नवीरसोबत हा विधी करत आहेत. व्हिडीओ पाहून नेटिझन्स कन्फ्युझ झाले.  अजय कुमार चौधरी फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video