मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'चूक कोणाची'? अपघाताचा हा विचित्र VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

'चूक कोणाची'? अपघाताचा हा विचित्र VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Accident Video) होत राहतात. मात्र सध्या एका अपघाताच मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Road Accident) होत आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : आधीच्या काळात रस्त्यावर जास्त प्रमाणात वाहनं दिसत नसे. मात्र आता देशाच्या अगदी कानाकोपऱ्यात दुचाकी आणि कारचा सर्रास वापर होताना दिसतो. यामुळे असं म्हटलं जातं की रस्त्यावर चालताना आपण नेहमी सावध राहायला हवं. सोबतच आपल्या चारही बाजूंना लक्ष द्यायला हवं. कारण कधी, कुठून आणि काय संकट येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. रस्ते अपघाताच्या घटना तर आजकाल सतत समोर येत असतात. दरवर्षी हजारो लोक अशा अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. मात्र यात जो गाडी चालवत असतो त्याचीच चूक असते, असं अजिबातही नाही. अनेकदा दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा भलत्यालाच मिळते.

जेव्हा आपसात भिडले दोन हत्ती; रेसलिंगचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Accident Video) होत राहतात. मात्र सध्या एका अपघाताच मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Road Accident) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरा मुलगा मस्ती करत रसत्यावरुन अतिशय वेगात सायकल चालवत आहे. रोड ओलांडणाऱ्या मुलाची नजर या सायकलकडे जाताच तो लवकर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा हा प्रयत्न त्यालाच महागात पडतो आणि सायकलवरील मुलगा त्याला जाऊन धडकतो.

अपघाताचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'चूक कोणाची'? अवघ्या 5 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईकही केला आहे.

हा माणूस आहे की स्पायडरमॅन? इमारतीवर चढतानाचा Video Viral, पाहूनच व्हाल थक्क

लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी आपली मतं मांडत सांगितलं, की याच चूक कोणाची आहे. एका यूजरने लिहिलं, 'चूक रस्ता ओलांडणाऱ्या मुलाची आहे, कारण तो रस्त्याकडे पाहून चालत नव्हता'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, 'चूक सायकल चालवणाऱ्या मुलाची आहे, कारण त्याने ब्रेक मारला नाही'. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Accident, Funny video, Road accident