नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली तरी, अग्निशमन दलाकडे घटनास्थळी पोहोचताच त्यावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता असते. आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचं व्यवस्थापन त्यांना इतक्या लवकर कसं जमतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर हा त्यांच्या हार्ड प्रशिक्षणाचा परिणाम आहे. अशाच एका फायरफायटरचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Firefighter’s Training Video) होत आहे, जो स्पायडर मॅनच्या वेगाने इमारतीवर चढताना दिसतो (Firefighter Climbed on Building like Spiderman).
घातक सापाला पकडायला गेली महिला; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL
TikTok व्हिडिओमध्ये फायरफायटरचा वेग आणि इमारतीवर चढण्याची पद्धत पाहून तुम्हाला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अवघ्या 17 सेकंदांच्या क्लिपमध्ये या व्यक्तीचं कौशल्य पाहून कोणीही थक्क होईल. इंटरनेटवर लोक या व्यक्तीची तुलना मार्वल जगतातील स्पायडरमॅनशी करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जॉर्ज नावाचा एक व्यक्ती दिसत आहे. वृत्तानुसार, तो बल्गेरियाचा रहिवासी असून व्यवसायाने फायरफायटर आहे. 17 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीचा वेग पाहून तुम्ही त्याचे चाहते व्हाल. हातात शिडी घेऊन तो एका तीन मजली इमारतीच्या दिशेने धावतो आणि डोळ्याची पापणी मिटण्याआधी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचतो. तो नॅशनल रेकॉर्ड होल्डर असल्याचंही सांगितलं जात आहे. इंटरनेटवर लोकांनी या व्यक्तीला स्पायडर मॅन ही पदवी दिली आहे.
चोरी रोखण्यासाठी महिला चोरासोबत भिडली; भामट्याने हत्यार काढलं अन्.., Video
व्हायरल होत असलेली ही टिकटॉक क्लिप आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी पाहिली आहे. लोकांनी जॉर्जच्या वेगाचं कौतुक केलं आहे आणि त्याचं वर्णन स्पायडरमॅनप्रमाणे चपळ व्यक्ती असं केलं आहे. एका यूजरने लिहिलं की - जर स्पायडरमॅनने आपली ग्रिपिंग पावर कमी केली , तर अॅव्हेंजर्सने या व्यक्तीला आपल्या पुढील चित्रपटात घ्यायला हवं. याआधीही न्यूयॉर्कमधून फायर फायटरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एखाद्या चित्रपटातील स्टंटप्रमाणे ट्रेनिंग पूर्ण करत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire station, Shocking video viral