मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालत असतानाच झाली तिसऱ्याची एण्ट्री; पाहा पुढे काय घडलं

VIDEO : प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालत असतानाच झाली तिसऱ्याची एण्ट्री; पाहा पुढे काय घडलं

बॉयफ्रेंड जेव्हा आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज (Marriage Proposal) करत असतो तेव्हा यात थोडीही कमी राहावी नाही, अशी त्याची इच्छा असते. तो आधीच सगळी तयारी करून ठेवतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) दररोज कित्येक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Videos) होतात. यातील एक व्हिडिओ असे असतात जे पाहून धक्का बसतो. तर, अनेक व्हिडिओ असे असतात जे पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

कुत्र्यासाठी त्याने भरधाव ट्रेनसमोर मारली उडी आणि...; धडकी भरवणारा VIDEO

बॉयफ्रेंड जेव्हा आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज (Marriage Proposal) करत असतो तेव्हा यात थोडीही कमी राहावी नाही, अशी त्याची इच्छा असते. तो आधीच सगळी तयारी करून ठेवतो. जोणेकरून त्या खास वेळी काहीही अडथळा येऊ नये. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं, की तरुण आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करत आहे. त्याचवेळी एक कुत्रा शेजारी येऊन असं काही करतो की प्रपोज करतानाच प्रियकराला थांबावं लागतं.

" isDesktop="true" id="616714" >

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याच्या तयारीत आहे. इतक्यात एक कुत्रा तिथे येतो आणि लघवी करून लागतो. हे पाहून आसपास उपस्थित सगळेच लोक हसू लागतात. यामुळे हे प्रपोजलही काही वेळासाठी थांबवावं लागतं.

Bungee Jumping करताना दोरी तुटल्यानं महिलेचा मृत्यू, Shocking Video

हा विनोदी व्हिडिओ पाहून लोक आपलं हसू आवरू शकले नाहीत. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, या व्हिडिओमध्ये तर पूर्ण लक्षच कुत्र्यानं वेधून घेतलं. तर, दुसऱ्या यूजरनं लिहिलं, मला फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. मी फक्त आपलं काम करत आहे. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ व्हायरलहॉगनं आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत 13 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

First published:

Tags: Funny video, Marriage