• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ऑनलाईन मिटिंगमध्ये बॉससोबत बोलत होती तरुणी आणि इतक्यात..; विचित्र घटनेचा VIDEO VIRAL

ऑनलाईन मिटिंगमध्ये बॉससोबत बोलत होती तरुणी आणि इतक्यात..; विचित्र घटनेचा VIDEO VIRAL

मीटिंगदरम्यान (Online Meeting) घडणाऱ्या अनेक मजेशीर घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. अशाच एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 29 जून : लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) अनेकजण घरूनच काम (Work From Home) करत आहेत. यावेळी मीटिंगदरम्यान (Online Meeting) घडणाऱ्या अनेक मजेशीर घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. अशाच एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक महिला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या बॉससोबत आणि इतर सहकाऱ्यांसोबत संवाद साधत असते. इतक्यात तिची खुर्ची तुटते आणि ती बॉससोबत बोलता-बोलताच खुर्चीवरुन खाली कोसळते. आक्षेपार्ह स्थितीत आढळलं जोडपं; गावकऱ्यांनी आधी व्हिडिओ बनवला आणि मग... शार्लेट कोज़िनेट्स (Charlotte Kozinets) नावाची ही महिला अमेरिकेत एका फर्निचर कंपनीत सेल्स असोशिएट म्हणून काम करते. कोज़िनेट्स आपल्या सीईओंसह काही सहकाऱ्यांसोबत मीटिंगदरम्यान संवाद साधत आहे. इतक्यात तिची खुर्ची तुटते आणि ती खाली कोसळते. कोज़िनेट्सचा कॅमेराही सुरू असल्यानं हे दृश्य पाहून मीटिंगमध्ये उपस्थित इतर सहकारीही हसू लागतात.
  View this post on Instagram

  A post shared by Charlotte (@charkozy)

  वाढदिवसाच्या केकनं वाचवला जीव; बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले दोघं भाऊ कोज़िनेट्स खाली पडल्यानंतर लगेचच उठून बसते आणि हसू लागते. तितक्यात ती आपल्या सहकाऱ्याला विचारते, की हा कॉल रेकॉर्ड केला गेला का? यातला एकजण हो असं उत्तर देतो. हे ऐकून कोज़िनेट्स आपला कॅमेरा बंद करण्याचा निर्णय घेते आणि दुसरी खुर्ची घेण्यासाठी निघून जाते. मात्र, ती माईक बंद करायचा विसरून जाते. यामुळे तिची मजेशीर प्रतिक्रियाही रेकॉर्ड होते आणि हे ऐकून तिचे सहकारीही हसू लागतात.
  Published by:Kiran Pharate
  First published: